Wed, Jul 08, 2020 09:19होमपेज › Marathwada › पसंतीक्रमांकातून ५९ लाखांचा महसूल

पसंतीक्रमांकातून ५९ लाखांचा महसूल

Published On: Feb 27 2018 2:00AM | Last Updated: Feb 27 2018 1:50AMजालना : अप्पासाहेब खर्डेकर

बियाणे नगरी असलेल्या जिल्ह्यात आलिशान वाहनांची खरेदी मोठ्याप्रमाणात होते. त्याबरोबरच वाहनाला मनाजोगता क्रमांक मिळावा यासाठीही खरेदीदारांचा प्रयत्न असतो. यामुळे अवघ्या दहा महिन्यांत 549 क्रमांकांमधून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास 59 लाख 18 हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे.

जिल्ह्यात फॅन्सी क्रमांक घेण्यासाठी क्रेझ वाढत आहे. यामुळे फॅन्सी नंबरमधून महसूल देणारा जिल्हा म्हणून जालन्याची ओळख निर्माण होत आहे. वाहनांच्या क्रमांकावरून येथे व्यक्ती ओळखल्या जातात. आमदार, खासदारांपासून बड्या लोकांची ओळख त्यांच्या वाहनांच्या क्रमांकावर होत आहे. उंच किमतीच्या परदेशी मोटारींची क्रेझ0 जालन्यात आहे. ऑडी, मर्सिडिझ, लँडक्रूझरपासून स्पोर्टस बाईकपर्यंत सर्व प्रकारची वाहने जिल्ह्यात पाहावयास मिळतात. 

जालनेकर हौशी आहेत. त्यामुळेच अनेक वेळा त्यांनी जादा शुल्क अदा करून पाहिजे तो क्रमांक मिळविला आहे. याचाच फायदा घेऊन राज्यपातळीवरून परिवहन विभागाने फॅन्सी क्रमांकाच्या दरात भरघोस वाढ केली.  

एक क्रमांकासाठी लाख रुपये असल्याने वाहनधारकांनी फिरवली पाठ

एक नंबर नको बाबा... अशी म्हणण्याची वेळ आता हौशी जालनेकरावर आली आहे. कारणही तसेच आहे. वाहनांच्या एक क्रमांकासाठी वीस-पंचवीस हजार नव्हे तर तब्बल एक लाख रुपये मोजावे लागतात. मात्र एक क्रमांक घेण्याकडेच वाहनधारकाचा प्रतिसाद कमी दिसून येतो. दोन अंकी, तीन अंकी व चारअंकी सीरिजमधील पसंती क्रमांक घेण्याकडे नागरिकांचा कल आहे.

एक लाख रुपये

एक नंबरसाठी चारचाकी वाहनधारकास एक लाख रुपये मोजावे लागतात, तर दुचाकी व तीनचाकी वाहनधारकास 25 हजार रुपये द्यावे लागतात. शिवाय 222 या सारख्या क्रमांकासाठी 10  ते 50 हजार रुपये असून 4000 हजारसारख्या क्रमांकांना 5 ते 25 हजार रुपये मोजावे लागतात. अन्य सिरीजमधील क्रमांकांना 2 ते 5 हजार रुपये मोजावे लागतात.