Mon, Jul 06, 2020 16:34होमपेज › Marathwada › परळीत महसूल कर्मचारी संघटनेचे बेमुदत कामबंद आंदोलन

परळीत महसूल कर्मचारी संघटनेचे बेमुदत कामबंद आंदोलन

Published On: Jul 21 2019 1:24AM | Last Updated: Jul 22 2019 2:02AM
परळी वैजनाथ : प्रतिनिधी     

 पाटोदा येथील तहसीलदार रूपा चित्रक यांनी महसूल कर्मचाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ महसूल कर्मचारी संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन आज शनिवारी (दि.२० रोजी) सुरू केले आहे. या आंदोलनात परळीतील महसूल संघटनेचे कर्मचारी सहभागी झाले. या आंदोलनामुळे दिवसभर नागरिकांची कामे खोळंबून राहिली होती.      

महसूल कर्मचारी संघटनेने बेमुदत काम बंद करण्याचा इशारा दिला होता. महसूल कर्मचाऱ्यांवर विनाकारण द्वेष भावनेने खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पाटोदाच्या तहसीलदार रूपा चित्रक यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी यावेळी महसूल कर्मचारी संघटनेने केली. या आंदोलनात महसूल कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले होते. 

या काम बंद आंदोलनामुळे तहसील व उपविभागीय कार्यालयातील कामे झाली नसल्याने नागरिकांना मात्र ताटकळत बसावे लागले आहे.