Wed, Jul 08, 2020 10:09होमपेज › Marathwada › तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमी उत्साहात

तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमी उत्साहात

Published On: Mar 25 2019 7:11PM | Last Updated: Mar 25 2019 7:11PM
तुळजापूर : वार्ताहर

येथील प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिरामध्ये परंपरेनुसार तुळजाभवानी देवीला रंग लावून देवी सोबत रंगपंचमी सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरातील सर्व प्रमुख पुजाऱ्यांसह ग्रामस्थ व भक्तगणांची मोठी उपस्थिती होती. 

सकाळी तुळजाभवानी देवीचे अभिषेक संपन्न झाल्यानंतर तुळजाभवानी देवीची साजशृंगार पूजा करण्यात आली.  आरती झाल्यानंतर पुजारी बांधवांकडून तुळजाभवानी देवीच्या मुर्तीस रंग लावण्यात आला. त्यानंतर पुजारी व उपस्थित भक्तांनी परस्परांना रंग लावून रंगपंचमी साजरी केली. दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी मंदिरामध्ये देवीला रंग लावून रंगपंचमी साजरी केली जाते. त्यानंतर संपूर्ण शहरात रंगपंचमीचा उत्सव साजरा केला जातो.