Wed, Jul 15, 2020 16:16होमपेज › Marathwada › परभणी : वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; मात्र जनजीवन विस्कळीत

परभणी : वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

Published On: Jun 03 2019 9:50PM | Last Updated: Jun 03 2019 9:50PM
पालम : प्रतिनिधी 

हवामान खात्याने मराठवाड्यातील काही जिल्ह्यात ४८ तासांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला होता हा अंदाज खरा ठरत मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली. पालम शहरात सायंकाळी ७:३० च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. 

उष्माने लाही लाही झालेल्या मराठवाड्याला वरूण राजाने आज थोडा थंडावा दिला. हवामान खात्यांच्या अंदाजानुसार मराठवाड्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने लावलेल्या या हजेरीमुळे शहरातील नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. तर शहरातील लावलेल्या अनेक होल्डिंग या वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाले. वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे शहरातील घरासह दुकानावरील अनेकांचे पत्र उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. या पावसामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र मागील अनेक दिवसांपासून उखाड्याने त्रासलेल्या नागरिकांना पावसाच्या सरींमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला.