Fri, Nov 27, 2020 10:57होमपेज › Marathwada › 'मराठवाड्याच्या प्रश्नाबाबत सतीश चव्हाण सभागृहात बोलत नाहीत'

'मराठवाड्याच्या प्रश्नाबाबत सतीश चव्हाण सभागृहात बोलत नाहीत'

Last Updated: Nov 21 2020 6:03PM
तुळजापूर : पुढारी वृत्तसेवा

मराठवाड्याच्या प्रश्नाबाबत सतीश चव्हाण सभागृहात बोलत नाहीत अशा निष्क्रिय प्रतिनिधीला पराभूत करा, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तुळजापूरमध्ये केले.

अधिक वाचा : पेट्रोलच्या दरात सलग दुस-या दिवशी वाढ!

तुळजापूर येथील पुजारी मंडळ कार्यालयात आयोजित केलेल्या मेळाव्यात विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी जि. प. अध्यक्ष नेताजी पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, प्रदेश सदस्य ॲड. अनिल काळे, जिल्हाध्यक्ष दत्ता कुळकर्णी यांची प्रमुख याप्रसंगी उपस्थित होती. यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी शिरीष बोराळकर विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. 

अधिक वाचा : फडणवीस हेच आमचे मुख्यमंत्री; आशिष शेलारांचा 'त्या' विधानावर 'यू टर्न'

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिरीष बोराळकर मराठवाड्याच्या पदवीधर आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नाबाबत जागरूक आहेत. भारतीय जनता पार्टी सातत्याने शैक्षणिक प्रगती आणि तंत्रज्ञानाचा विकास यांना सोबत घेऊन कार्यरत असल्यामुळे येणाऱ्या काळात शिरवळकर यांच्या माध्यमातून मराठवाड्याच्या प्रश्नाला निश्चित न्याय मिळेल असा विश्‍वास ही त्यांनी व्यक्त केला. यामुळे कार्यकर्त्यांनी जागृत होऊन सतीश चव्हाण यांचा पराभव करावा असे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले. या कार्यक्रमाचे आभार आनंद कंदले व गुलचंद व्यवहारे यांनी मानले.