Tue, Jul 14, 2020 02:31होमपेज › Marathwada › परळी : धनंजय मुंडेंना 'वैद्यनाथ'च्‍या प्रवेशद्वारावरच रोखले

धनंजय मुंडेंना 'वैद्यनाथ'च्‍या प्रवेशद्वारावरच रोखले

Published On: Dec 10 2017 2:18PM | Last Updated: Dec 10 2017 5:32PM

बुकमार्क करा

बीड :प्रतिनिधी

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंना यांना पोलिसांनी वैजनाथ साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावरच रोखले. साखर कारखान्यातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कारखान्‍याची पाहणी करण्यासाठी ते गेले होते. पोलिसांबरोबर १५ मिनिटे बोलणे झाल्यानंतर त्यांना कारखान्यात सोडण्यात आले. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मालकीचा आहे.

पांगरी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यात दोन दिवसापूर्वी रसाची टाकी फुटून मोठी दुर्घटना घडली. आतापर्यंत या घटनेतील पाच जखमींचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी भेट देण्यासाठी गेले असताना धनंजय मुंडे यांना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संपत पाळवदे यांनी प्रवेशद्वारावरच रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांना आत कारखान्यामध्ये सोडता येणार नाही असा पवित्रा पाळवदे यांनी घेतला. मात्र,मी कारखान्याचा सभासद असल्याने मला इथे येण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. जवळपास दहा मिनिटे बोलणे झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना कारखान्यात सोडण्यात आले.

या दुर्घटनेची सखोल चौकशी व्हावी : धनंजय मुंडे 

‘वैद्यनाथ कारखान्यात घडलेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी असून मी याचे राजकारण करणार नाही. मात्र, घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे,असे धनंजय मुंडे यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सांगितले. टाकी जुनी होती का? टाकीच्या क्षमतेपेक्षा अधिक वाफ आत सोडण्यात आली होती का? याचा शोध घेतला पाहिजे. ही दुर्घटनेस मानवी चुकीमुळे झाली असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे’,असे धनंजय मुंडे म्हणाले.

‘टाकीत १०० डिग्री पेक्षा अधिक उकळता रस असताना गळती असताना टाकीला खालून वेल्डिंग करणे ही बाबी संशयास्पद असल्याच मुंडे म्हणाले. हा सरळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे, पण चौकशी नेमकी कशी होते?,  पोलीस,कारखाना प्रशासन आणि राज्यसरकार काय भूमिका घेते हे पाहावे लागेल.मात्र एकंदरीतच हा प्रकार दाबण्याचे प्रयत्न सुरु असल्‍याचा संशय येत असल्याच मुंडे म्‍हणाले.तसेच,जखमींच्या उपचाराचा पूर्ण खर्च कारखाना प्रशासनाने करावा आणि पिडीत कुटुंबांना प्रत्येकी १० लाखांची मदत देण्याचीही मागणी धनंजय मुंडे यांनी यावेळी केली.

लोकप्रतिनिधींना घटनास्थळी जाऊ न देण्याचा हा प्रकार पोलिस मंत्र्यांच्या दबावाखाली करीत असनु, या प्रकरणी आपण सभागृहात आवाज उठवु असे सांगितले. या घटनेत मृत्यु झालेल्या लिंबोटा, देशमुख टाकळी, गाढे पिंपळगावं येथील कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेवुन त्यांनी त्यांचे सांत्वन केले. घटनेत मृत झालेले कर्मचारी हे घरातील प्रमुख असल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे . या घटनेचे आपल्याला राजकारण करायचे नाही मात्र ज्या पध्दतीने आपल्याला रोखण्याचा प्रयत्न झाला ते पाहता कारखाना प्रशासनच या घटनेत जबाबदार असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

वाचा : 
वैद्यनाथ दुर्घटना : मृतांच्या वारसांना प्रत्येकी सहा लाख रुपये 

पंकजाताई मुंडेंना पाहताच नातेवाईकांना अश्रू अनावर