Wed, Jul 08, 2020 09:34होमपेज › Marathwada › मुंबई-पुण्यातील गुणवत्ता बीडमध्ये होतेय उत्तीर्ण

मुंबई-पुण्यातील गुणवत्ता बीडमध्ये होतेय उत्तीर्ण

Published On: Mar 10 2018 2:08AM | Last Updated: Mar 10 2018 1:51AMबीड : उत्तम हजारे

कॉपीसाठी प्रसिद्ध असलेल्या बीड जिल्ह्यात शिक्षणाचे नवे वारे वाहू लागले आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी मुंबई, पुणे व इतर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी बीड जिल्ह्यात परीक्षा देताना दिसून येत आहेत. दहावी-बारावीच्या परीक्षेपुरते बीड जिल्ह्यात प्रवेश घ्यावयाचा व जास्तीचे मार्क मिळवून, पुन्हा मूळ ठिकाणी शिक्षणासाठी जायचे असे प्रकार सुरू आहेत. 

बीड जिल्ह्यातील विविध केंद्रावर सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे परीक्षा देण्यासाठी परजिल्ह्यातील हजारो विद्यार्थी येथे दाखल झाले आहेत. बीड, पाटोदा, आष्टी, गेवराई, माजलगाव, परळी या तालुक्यात हे प्रमाण अधिक आहे. काही विद्यार्थी केवळ उत्तीर्ण होण्यासाठी बीड जिल्ह्यातील विविध शाळा-महाविद्यालयात प्रवेश घेतात, तर काही विद्यार्थी पैकीच्या पैकी मार्क मिळविण्यासाठी येथे प्रवेश घेताना दिसून आले आहेत. यातूनच परीक्षा केंद्र मॅनेज करण्याच्या प्रकार घडतात. जिल्ह्यातील काही शाळा-कॉलेज तर काही अटींवर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची हमी घेतात. त्यातून मोठी आर्थिक उलाढालही झालेली दिसून येते. दहावी-बारावीसाठी जेवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी वीस टक्के विद्यार्थी परजिल्ह्यातील असल्याचा अंदाज शिक्षण तज्ज्ञांनी वर्तविला आहे.