पाथरी (परभणी) : प्रतिनिधी
दरवर्षी मार्च महिन्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणारे पाथरी तालुक्यातील वाघाळा गाव. वाघाळा ग्रामपंचायतीने गेल्या दोन वर्षात 'पाणी अडवा पाणी जिरवा' या गोष्टीवर विशेष भर दिला. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावात पाण्याचे तुडवडा होऊन नागरिक भीषण पाणीटंचाईला तोंड देत असताना वाघाळा पाणीपुरवठा योजनेच्य विहीरीचे पाणी अवघ्या दहा फुटांवर आहे. यामुळे ग्रामपंचायत भर ऊन्हाळ्यात ही गावातील नागरिकांना दररोज पाणी पुरवते. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गावाने पाणी टंचाईवर मात केली असल्याचे दिसुन येते.
तालुक्यातील ४५००लोकसंख्या असलेले गाव ऊन्हाळ्यात पाणीटंचाई पाचविला पुजलेली. जनावरांना पाणी पाजण्यासाठी पशुपालकांना दरवर्षी भटकंती करावी लागत असे. गेल्या दोन वर्षात ग्रामपंचायतने गावाच्या बाजूस जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गात सात बंधाऱ्याची कामे केली. गावातील अनेक विहीरीचे पुन्हा भरण केले. गावा शेजारच्या नदीत पाच चार्जींग बोअर घेतले. यामुळे गावातील पाणीटंचाई दूर झाली आहे. ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा योजनेची विहार ७० फूट खोल असून विहीरीत ६० फुटापर्यंत वर पाणी आहे. गावात पाणीपुरवठा करण्यासाठी। ७० हजार लिटरचा एक आणि एक लाख लिटरचा एक असे दोन जलकुंभ आहेत. यातुन भर ऊन्हाळ्यात नागरिकांना पाणी पुरवठा केला. जातो.
यशस्वी योजना राबवल्याचे यश
जिल्हा परिषद सदस्या वसुधराताई घुबरे ,माणीक आप्पा घुबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षापासून जलयुक्त शिवार अभियान राबवले. यामुळेच नेहमी निर्माण होणार्या पाणीटंचाईवर मात करता आली असल्याचे वाघाळा गावच्या सरपंच अर्चना सदाशिव घुबरे यांनी सांगितले.