Mon, Dec 16, 2019 08:18होमपेज › Marathwada › परभणी : भाज्यांचे भाव भिडले गगनाला

परभणी : भाज्यांचे भाव भिडले गगनाला

Published On: May 19 2019 5:53PM | Last Updated: May 19 2019 5:53PM
जिंतूर : प्रतिनिधी 

सध्या कडक चढलेल्या उन्हाच्या पाऱ्या समान बाजारामधील जीवनावश्यक  असलेल्‍या भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे स्‍वयंपाक घराचे गणित बिघडल्याने गृहणी चिंतेत आहेत.भाज्याचे भाव उन्हाळ्यात वाढलेले आहेत.  कारण तालुक्यात सिचनांचे क्षेत्र नसल्यामुळे शहरातील येणाऱ्या भाजीपाल्याची आवक ही कमी झाली आहे. 

अन्य भागातून शहरात विक्रीसाठी  येणारा माल जास्त भावाने शहरातील किरकोळ व्यापाऱ्यांना खरेदी करावा लागत आहे. यामुळे  शहरातील ग्राहकांना याचा फटका बसत आहे. तालुक्यात जे काही शेतकरी उपलब्ध पाणी स्त्रोताच्या मदतीने भाजीपाला घेत होते. पाण्याचे अल्पप्रमाण व कडक उन्हामुळे शेतातील सर्व भाजीपाला जळून जात आहे. याचा परिणाम म्‍हणजे बाहेरुन आवक झालेल्या भाज्यांचे भाव कडाडले आहेत.

  ऐन रमजानमध्ये भाजीपाल्‍याची मागणी वाढली मात्र पुरवठाच नाही

सध्या मुस्लिम बांधवाचा पवित्र रमजानचा महिना सुरू आहे. शहरात मुस्लिम बांधवाची संख्या जास्त प्रमाणात आहे. सहाजिकच फळे, भाजीपाला याची मागणी मोठ्या प्रमाणात होऊन सुद्धा त्या प्रमाणात पूरवठा होताना दिसून येत नाही.  आवक कमी असल्‍याने व्यापारी वर्गाने फळे, भाजीपाल, इत्‍यादी वस्तुंचे  दर  वाढवले आहेत.

टोमॅटो भाव प्रति किलो 80 ये 100 रु एवढे आहेत. तर 10 रुपयास भेटणारी मेथीची जुडी 20 ते 30 रुपयाश  भेटणे दुरापास्त झाले आहे.  गवार, शेवगा, भेंडी, चवळी, दोडका,  आदी भाज्यांचे भाव 100 रुपये किलो असे झाले आहेत. सुकामेवा  व फळांनी देखील वाढत्या भावाचा उच्चांक गाठल्याने सर्वसामान्‍य माणूस चिंतेत आहे.