Wed, Sep 23, 2020 08:12होमपेज › Marathwada › प्रभू श्रीरामास पंकजा मुंडे यांचे कलात्मक नमन  (video)

प्रभू श्रीरामास पंकजा मुंडे यांचे कलात्मक नमन  (video)

Last Updated: Aug 05 2020 1:29AM
परळी वैजनाथ : पुढारी वृत्तसेवा

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी अयोध्या येथे उद्या (दि.५) प्रभू श्रीराम यांच्या भव्यदिव्य मंदिराचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करणार आहेत. श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर मंदिराच्या निर्माण कार्यास प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येकजण या ऐतिहासिक आनंदी क्षणात श्रद्धेने सहभागी होत आहेत. राज्याच्या माजी ग्रामविकासमंत्री भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी अनोख्या पद्धतीने आपली श्रद्धा प्रकट केली आहे. प्रभू श्रीरामाचे स्वहस्ते सश्रद्ध  चित्र त्यांनी साकारत पंकजाताई मुंडे यांनी कलात्मक नमन केले आहे.

अयोध्येत प्रभू श्रीराम यांचे भव्यदिव्य मंदिर असावे ही आस्था उद्या प्रत्यक्षात साकारली जाणार आहे. अनेक वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर समस्त देशवासीयांचे स्वप्न या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा व्यक्त करताना पंकजाताई मुंडे यांनी अनोख्या पद्धतीने आपली श्रद्धा प्रकट केली आहे. नेहमीच काही तरी विशेष व अनोखी संकल्पना मांडणाऱ्या पंकजाताई यांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊन परिस्थितीत आपला चित्रकलेचा व्यासंग वाढवला आहे. यापुर्वीही त्यांनी रेखाटन केलेल्या चित्रावरुन मोठी चर्चा घडली होती. श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंकजाताई यांनी त्यांच्या भावविश्वातील प्रभू श्रीरामाचे सुरेख व विलोभनीय चित्र साकारले आहे. या माध्यमातून भूमीपुजन सोहळ्याला त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या असून या चित्राखाली त्यांनी "Trying to put my trust through brush to bow down to the maryada purushottam  ‘Shree ram’.. big day tomorrow .." असे लिहीत मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम चरणी नमन केले आहे.

 "