होमपेज › Marathwada › तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या मालमत्ता जप्‍तीचे आदेश

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या मालमत्ता जप्‍तीचे आदेश

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

उस्मानाबाद : प्रतिनिधी

तुळजाभवानी मंदिरातील पाच कर्मचार्‍यांच्या सहाव्या वेतन आयोगाची थकीत रक्‍कम न दिल्याने तुळजाभवानी मंदीर संस्थानची मालमत्ता जप्‍त करण्याचे आदेश लातूर येथील कामगार न्यायालयाने दिले आहेत. अधिकार्‍यांनीही या आदेशाला दुजोरा दिला आहे. 

तुळजाभवानी मंदिर संस्थानातील सेवानिवृत्त शिपाई प्रकाश सोंजी, दत्तात्रक शळके, सुरक्षा रक्षक अरूण माने, श्रीधर गणपत शिंदे, पांडुरंग सोनवणे यांनी वेतन आयोग फरकाची रक्‍कम तसेच महागाई भत्ता व वेतनश्रेणी फरकाची रक्‍कम मिळावी यासाठी लातूरच्या कामगार न्यायालयाकडे दाद मागितली होती. 2013 पासून या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यावर हा आदेश न्यायालयाने दिला आहे. मंदीर संस्थान प्रशासकीय इमारत, मंदीर धर्मशाळा, तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय यांसह संस्थानच्या विविध अंगीकृत कार्यालयातले संगणक जप्‍त करुन थकबाकी वसुलीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पाचव्या वेतन आयोगाचा फरक दिला आहे. सहाव्या आयोगाच्या रकमेबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. कायदेशीर सल्ल्याने पुढील निर्णय घेऊ, अशी माहिती मंदीर समितीच्या अधिकार्‍यांनी दिली.

Tags : Osmanabad, tulja bhawani temple, property ,seize, court order,


  •