Sun, Aug 09, 2020 02:47होमपेज › Marathwada › परभणी : मानवत नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय

परभणी : मानवत नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय

Published On: Jun 24 2019 3:21PM | Last Updated: Jun 24 2019 3:00PM
मानवत : प्रतिनिधी

येथील नगराध्यक्षपदी झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीचे उमेदवार प्रा. सखाहारी पाटील यांचा यांनी एकतर्फी विजय मिळवला. सखाहारी पाटील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पूजा खरात यांचा तब्बल 9 हजार 439 मतांनी पराभव केला. पाटील यांच्या या विजयामुळे आमदार मोहन फड यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे .

नगराध्यक्ष शिवकन्या स्वामी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने या पदासाठी २३ जूनला मतदान झाले होते. या निवडणुकीत 58.85 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. यात भाजपा शिवसेना युतीचे प्रा. सखाहारी पाटील यांना 12 हजार 210 मते मिळाली. तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पूजा खरात यांना 2 हजार 771 मते मिळाली. यात पाटील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या खरात यांचा तब्बल 9 हजार 439 मतांनी पराभव केला. अपक्ष उमेदवार रतनकुमार वडमारे यांना 273 तर नोटाला 141 मतदान मिळाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी व सहाय्यक निवडणूक अधिकारी उमेश ढाकणे यांनी दिली. 

मतमोजणी सकाळी 10 वाजता येथील तहसील कार्यालयात झाली. एकूण मतमोजणीच्या 3 फेऱ्या झाल्या. या 3 फेरीत भाजपाने निर्विवाद आघाडी घेतली. या यशात भाजपचे आमदार मोहन फड, युवा नेते डॉ. अंकुश लाड, तालुकाध्यक्ष अनंत गोलाईत व सर्व शिवसैनिकासह भाजप सेनेच्या सर्व नगरसेवकांचा मोठा वाटा होता. 

भव्य मिरवणूक

प्रा. सखाहरी पाटील यांचा विक्रमी मतांनी विजयी झाल्याबद्दल त्यांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत आमदार मोहन फड, डॉ अंकुश लाड व अन्य सामील झाले होते. 

विधानसभा निवडणुकीतही जनतेची अशीच साथ : आमदार मोहन फड

या विजयाचे खरे श्रेय मानवतच्या जनतेचे असून यापुढेही मानवत सह संपूर्ण पाथरी विधानसभा मतदारसंघात विकास कामात कोणतेही राजकारण न करता अशीच सुरू ठेवणार असून येत्या विधानसभा निवडणुकीत ही जनता अशीच साथ देणार असल्याचा ठाम विश्वास आमदार मोहन फड यांनी दै. पुढारीशी बोलतांना व्यक्त केला . 

विकास कामाची पावती : डॉ अंकुश लाड

नगर पालिकेतील सत्तेच्या माध्यमातून आमदार मोहन फड यांच्या सक्षम नेतृत्वाखाली शहरात गेल्या 3 वर्षात जी विकास कामे करण्यात आली त्या विकास कामाची ही पावती असून शहरातील सर्वधर्मीय नागरिकांनी आम्हाला मतदान केल्याचे युवा नेते डॉ अंकुश लाड यांनी सांगितले.