कोरोनामुळे तुळजापुरातील कोजागिरी पौर्णिमेची यात्रा निर्मनुष्य

Last Updated: Nov 01 2020 1:01AM
Responsive image


तुळजापूर : पुढारी वृत्तसेवा

हजारोंच्या संख्येने कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने तुळजापुरात भरणारी वर्षातील सर्वात मोठी यात्रा कोरोनाच्या संकटामुळे निर्मनुष्य ठरली. पोलिस प्रशासनाने मंदिरा भोवती केलेल्या कडक बंदोबस्तामुळे भाविक मंदिराकडे फिरकले नाहीत.  

तुळजाभवानी देवीच्या परंपरेने भरणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या यात्रेला कोरोना संकटाचा फटका बसला आहे. या काळात मंदिर परिसरात भाविकांना दर्शन बंदी राज्य सरकारने लागू केल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने तुळजापुरात भाविकांना येण्यासाठी बंदी घालण्यात आली. यामुळे तुळजापूरकडे येणाऱ्या सर्व मार्गावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर तुळजापूर शहरात येणाऱ्या भाविकांची संख्या अत्यंत नगण्य ठरली. 

अधिक वाचा : लेट नाईट वेब सिरीज बघण्याच्या सवयीने वाचवला ७५ लोकांचा जीव

प्रशासनाला भाविकांना रोखण्याचे मोठे आव्हान होते. मात्र पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन यांनी एकजुटीने ३०० पोलिस कर्मचारी तैनात करून हे आव्हान यशस्वी पेलल्याचे शुक्रवारी दिवसभर दिसून आले. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर कौस्तुभ दिवेगावकर, तहसीलदार सौदागर तांदळे यांनी सर्व मार्गावर पाहणी करून आढावा घेतला. जिल्हा पोलिस प्रमुख राजतिलक रोशन यांनीही या काळात बंदोबस्त आणि भाविकांची प्रवेशबंदी करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले. 

अधिक वाचा :भारतीय सैन्यानं SAI ॲप केलं लाँच

भाविकांना प्रवेश बंदी असल्यामुळे तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये आणि शहर परिसरामध्ये स्थानिक नागरिक वगळता बाहेरच्या नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला होता. अनेक भाविकांना वाटेतूनच परतीचा प्रवास करण्यासाठी प्रशासनाने विनंती केली. या काळात तुळजापुरात व्यापार होऊ शकला नाही. प्रसाद दुकाने आणि उपहारगृहे तसेच यात्रेवर अवलंबून असणारे फुटपाथवरील व्यापारी हे  दिवसभर ग्राहकाविना ओस पडले होते.  

विराट कोहलीने मला माहीत नाही म्हणताच बीसीसीआयने झटक्यात तोंड उघडले!


रिक्षावर बसून अनुष्का शर्माच्या अदा! (video)


मिग-29K प्रशिक्षण विमान अरबी समुद्रात कोसळले


विकृत बुद्धीचे चाळे करू नका; आमच्याकडेही मालमसाला आहे : उद्धव ठाकरे


INDvAUS LIVE : ऑस्ट्रेलियाची दमदार सलामी


बीएमसीने कंगनाच्या ऑफीसवर घातलेला 'जेसीबी' बरोबर की चुकीचा? आज निर्णय येणार!


अजित पवारांसह ६९ जणांना दिलासा; 'ईडी'चा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला


गुजरातमध्ये कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत ५ रुग्ण मृत्यूमुखी


नाशिक : चाळीसगाव तालुक्यातील २१ वर्षीय जवान यश देशमुख श्रीनगरमध्ये शहीद


पीएम मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात उदयनराजे भोसलेंची वर्णी लागणार?