Tue, Dec 10, 2019 02:05होमपेज › Marathwada › नांदेडमध्ये डॉक्टरनी केली स्वतःचीच एन्डोस्कोपी!

नांदेडमध्ये डॉक्टरनी केली स्वतःचीच एन्डोस्कोपी!

Published On: Oct 21 2018 2:18AM | Last Updated: Oct 21 2018 1:30AMनांदेड : प्रतिनिधी

येथील पोटविकारतज्ज्ञ डॉ. नितीन जोशी यांनी स्वत:ची एन्डोस्कोपी आणि तीही भूल न घेता केली. चौथ्या प्रयत्नात ते यात यशस्वी झाले. हा प्रयोग त्यांनी रुग्णांना विश्‍वासात घेण्यासाठी केला.

डॉ. जोशी यांनी यापूर्वी मागील तीन वर्षांत दहा वर्षांच्या बालकापासून ते नव्वद वर्षांच्या वयोवृद्धांपर्यंत सुमारे नऊ हजार एन्डोस्कोपी केल्या. स्वत:वर एन्डोस्कोपी  करताना त्यांनी 9.2 मि. मी.चा व्यास आणि 120 सें.मी.ची लांबी या आकाराची स्कोपी वापरली. पोटाच्या लहान आतड्यांपर्यंत ही स्कोपी गेली होती. वैद्यक क्षेत्रातला एखादा अवघड उपचार करून घेताना रुग्णांचा नाईलाज असतो; परंतु तो त्यातल्या त्यात सहनीय व्हावा, यासाठी काय करता येऊ शकते, अशी संवेदना जपणारे डॉ. नितीन जोशी यांनी स्वत:लाच त्यासाठी सिद्ध केले. वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासात हा प्रयोग केवळ जपानी आणि कोरियन डॉक्टरांनीच केला आहे.