Thu, Jul 02, 2020 19:13होमपेज › Marathwada › राजकिशोर मोदींना काँग्रेसकडून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर

राजकिशोर मोदींना काँग्रेसकडून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर

Last Updated: May 10 2020 9:18AM
अंबाजोगाई (जि. बीड) : पुढारी वृत्तसेवा 

विधान परीषदेच्या रिक्त नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. या जागांपैकी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातील राजकिशोर उर्फ पापा मोदी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. त्यासोबतच राजेश धोंडीराम राठोड यांना देखील काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. सोमवारी (ता.११) राजकिशोर मोदी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

राजकिशोर मोदी हे गेली चाळीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. मागील २५ वर्षे त्यांनी अंबाजोगाई नगर परिषद आपल्या ताब्यात ठेवली आहे. काँग्रेस पक्षाने आजपर्यंत त्यांच्या पक्षनिष्ठेची दखल घेतली असून पाच वर्षे वैधानिक विकास महामंडळ, १० वर्षे कापूस पणन महासंघाचे उपाध्यक्षपद, राज्य कार्यकारिणीत सहसचीव, जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. 

२१ मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष दोन जागा लढवणार आहे. या जागांसाठी राजकिशोर मोदी आणि राजेश धोंडीराम राठोड यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत असल्याचे आज शनिवारी सायंकाळी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केले. राजेश राठोड हे जालना जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत. एनएसयूआयपासूनच ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव म्हणूनही ते संघटनेत काम करत आहेत.