Sat, Jul 11, 2020 09:03होमपेज › Marathwada › नांदेड : माजी पंचायत समिती सभापतींची गळफास घेऊन आत्महत्या 

नांदेड : माजी पंचायत समिती सभापतींची गळफास घेऊन आत्महत्या 

Last Updated: Jun 30 2020 4:14PM
मुदखेड (नांदेड) : पुढारी वृत्तसेवा 

मुदखेड पंचायत समितीच्या माजी सभापती शिवकांता शत्रुघ्न गंडृस यांनी आपल्या राहत्या घरी (ता.२८) गाव तालुका मुदखेड येथे गळफास लावून आत्महत्या केली. मुदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाले हे आपल्या दोन कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचले. 

अधिक वाचा : देशात २४ तासांत ४१८ जणांचा कोरोनाने मृत्यू

घरातील गजाला साडी बांधुन गळफास घेऊन शिवकांता यांनी आत्महत्या केली आहे. शिवकांता यांनी हे पाऊल का उचलले हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच परिसरात सर्वत्र हळहळ ही व्यक्त होत आहे. सायंकाळच्या वेळेस घरात कुणीही नसल्याचा अंदाज घेत त्यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यांनी वयाच्या २६ व्या वर्षी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.