औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार सतीश चव्हाण विजयाच्या समीप पोहचले असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तिसऱ्या फेरी दरम्यान सतीश चव्हाण यांनी ४११९८ मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे यावेळी त्यांची हॅटट्रिक पक्की मानली जात आहे.
पदवीधर निवडणुकीत कमीत कमी ७५ हजारांच्या विक्रमी मतांनी विजयी होईल, असा विश्वास व्यक्त करणाऱ्या राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांना त्याच्या मागील दोन टर्मची पोहचपावती मिळताना दिसत आहे. यावेळी सतीश चव्हाण यांनी जनतेने महाविकास आघाडी सरकारला मान्यतेची पावती दिली असून भाजपच्या घसरणीचा काळ आता सुरू झाल्याचे मत व्यक्त केले.
तिसऱ्या फेरी अखेर सतीश चव्हाण यांना ४११९८ मतांची आघाडी मिळाली आहे. तिसऱ्या फेरी अखेर १ लाख ५३ हजार ३० मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये चव्हाण यांना ८१२१६ मते मिळाली आहेत तर भाजपचे बोराळकर यांना ४००१८ मते मिळाली आहेत. तर १६०४४ मते बाद झाली आहेत.