Fri, Jul 10, 2020 01:53होमपेज › Marathwada › उस्‍मानाबादमध्ये पुन्हा गूढ आवाजाची दहशत

उस्‍मानाबादमध्ये पुन्हा गूढ आवाजाची दहशत

Published On: Feb 07 2019 4:21PM | Last Updated: Feb 07 2019 4:21PM
उस्मानाबाद : प्रतिनिधी

उस्‍मानाबाद शहरात आज गुरूवारी दुपारी २ वाजून १६ मिनिटांच्या सुमारास मोठा गूढ आवाज झाला. या आवाजाची तीव्रता मोठी होती. या आधीही अनेकवेळा असे आवाज झाले आहेत. मात्र हा आवाज कशामुळे होतो. तो कुठे उत्‍पन्‍न होतो. याचे नेमके कारण स्‍पष्‍ट झालेले नाही. मात्र अशा या गुढ आवाजामुळे लहान मुले आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. 

या विषयी अधिक माहिती अशी की, गेल्‍या १० वर्षांपासून उस्‍मानाबाद शहर, तालुका, कळंब, भूम आणि तुळजापूरच्या काही भागात मोठा गुढ आवाज ऐकु येतो. मात्र हा आवाज कोठून येतो, कशाचा येतो, या विषयीची गुढता कायम आहे. काही वेळा या गुढ आवाजाची तीव्रता इतकी जास्‍त असते की, या आवाजाच्या तीव्रतेने खिडक्‍यांची तावदाने कंप पावतात. रॅकमधली भांडी खाली पडतात. यामुळे घरातील लहान मुले आणि महिलांमध्ये या आवाजाविषयी आता घबराट निर्माण झाली आहे.

विशेष म्‍हणजे भूकंप मापन यंत्रावर देखील या आवाजाची नोंद होत नाही. त्‍यामुळे याला भूकंपही म्‍हणता येत नाही. गेल्‍या १० वर्षांपासून या गुढ आवाजाची नागरिकांत भीती असताना प्रशासनाकडून मात्र या आवाजा मागचे कारण शोधण्याबाबत कोणतीही हालचाल दिसत नाही. त्‍यामुळे या विषयी एकीकडे प्रशासन उदासीन आहे तर, दुसरीकडे नागरिकांमध्ये या विषयी भीतीचे वातावरण गडद होत असल्‍याचे चित्र आहे.