होमपेज › Marathwada › लातूर : निटूरमध्ये माय-लेकराची आत्महत्या

लातूर : निटूरमध्ये माय-लेकराची आत्महत्या

Published On: Jan 18 2019 10:00PM | Last Updated: Jan 18 2019 10:00PM
लातूर : प्रतिनिधी 

मुलाच्या आत्महत्येने व्यथित झालेल्या आईनेही गळफास घेऊन जीवन संपवले. निलंगा तालुक्यातील  निटूर येथे शुक्रवारी (दि १८)  ही घटना घडली. नितीन  घोडके (३०) व आशाबाई घोडके (५०) अशी आत्महत्या केलेल्या माय- लेकरांची नावे आहेत. 

नितीनने दुपारी त्याच्या राहत्या घरी गळफास घेतला. त्याच्या आत्महत्येची माहिती  कळतात आई आशाबाईंना धक्का बसला. त्यातूनच त्यांनी सायंकाळी शेतात गळफास घेतला. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.