Sun, Jul 05, 2020 16:55होमपेज › Marathwada › शेकडो वर्षांपासून होत नाही दुधाची विक्री 

शेकडो वर्षांपासून होत नाही दुधाची विक्री 

Published On: Apr 22 2018 1:12AM | Last Updated: Apr 21 2018 10:36PMपाटोदा : महेश बेदरे

तालुक्यातील डोंगरांच्या कुशीत वसलेल्या खडकवाडी या गावात तब्बल चारशे वर्षांपासूनची एक अत्यंत आश्चर्यकारक प्रथा सुरू आहे. या गावातील लोक अजुनही दूध, दही, ताक तसेच दुधापासून तयार झालेल्या पांढर्‍या रंगाच्या कुठल्याही पदार्थाची विक्री करत नाहीत. या ठिकाणी नवनाथांपैकी एक असलेले कानिफनाथ महाराजांचे देवस्थान असून त्यांच्याच एका आख्यायिकेमुळे या गावात दूध विक्री न करण्याची परंपरा सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे.
अत्यंत निसर्गरम्य वातावरणात व डोंगराच्या कुशीत वसलेले पाटोदा तालुक्यातील खडकवाडी हे जेमतेम दोन हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेले छोटेसे गाव. या गावावर निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण केलेली आहे. गावात दूध विक्री न करण्याची प्रथा ही चारशे वर्षांपासून पाळली जाते.

या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हाच असल्याने येथील बहुतांश लोकांकडे दुभती जनावरे आहेत. गावातील लोक दूध व दुधापासून तयार झालेल्या पदार्थाची विक्री करत नाहीत. या प्रथेबद्दल तेथील काही वयोवृद्ध व्यक्तींनी सांगितले, की  या ठिकाणी पूर्वी कानिफनाथांचे वास्तव्य होते. तेव्हा या डोंगरात काही चुकार्‍यांच्या म्हशी आल्या होत्य. त गुराखी कानिफनाथांना म्हणाले की आमच्या म्हशींचा काळा रंग बदलला व जर असे झाले तर आम्ही त्यांचे दूध कधीही विकणार नाही. त्यानंतर जनावरांचा रंग बदलला व तेव्हा दूध विक्री न करण्याची प्रथा सुरू झाली ती आजतागायत पाळली जाते. या गावातील घरांच्या भिंतींना चुना लावला जात नाही. या प्रथा आजही तितक्याच श्रद्धेने पाळल्या जातात.

Tags : Marathwada, Milk, sales, happen,  hundreds, years