Mon, Jun 01, 2020 04:52होमपेज › Marathwada › बीड : आदेश भंगामुळे माजलगावचा पेट्रोल पंप सील 

बीड : आदेश भंगामुळे माजलगावचा पेट्रोल पंप सील 

Last Updated: Apr 02 2020 6:54PM
माजलगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील सावरगाव येथील पसायदान पेट्रोल पंपातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश भंग केल्यामुळे पंप सील करण्यात आला. ही कारवाई येथील तहसिलदार डॉ. प्रतिभा गोरे यांच्या आदेशाने नायब तहसिलदार सुनिल पत्की यांनी केली. तसेच पंप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांमध्ये खळबळ माजली आहे.

बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी देशातील आपतकलीन परिस्थीती बाबत दि. २६/३/२०२० रोजी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, आत्यअवश्यक सेवा वगळता इतर कोणालाही पेट्रोल/डिझेल देता येणार नाही. तशा सूचनाही जिल्ह्यातील सर्वच पेट्रोल पंपांना दिल्या होत्या. मात्र माजलगाव शहरातील सावरगाव येथील इंडियन ऑईल कंपणीचा पसायदान पेट्रोल पंपावर मनाई आसतानाही खासगी व्यक्तीस डिझेल दिल्याचे आढळून आले आहे. 

त्यामुळे तहसिलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी तात्काळ नायब तहसिलदार सुनिल पत्की यांना पेट्रोल पंप सील करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे या पेट्रोल पंपावर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी माजलगाव ग्रामिण पोलिस ठाण्यात मंडळ अधिकारी कोमटवार यांनी फिर्याद दिली होती.