Mon, Jul 06, 2020 22:14



होमपेज › Marathwada › हिंगोली : शेतीच्या वादातून खून; सात जणांविरूद्ध गुन्हा

शेतीच्या वादातून खून; सात जणांविरूद्ध गुन्हा

Published On: May 22 2019 2:23PM | Last Updated: May 22 2019 2:32PM




हिंगोली : प्रतिनिधी

शेतीच्या वादातून सात जणांनी मिळून एक जणावर कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची घटना घडली. ही घटना  हिंगोली तालुक्यातील राहोली बु. येथे  बुधवारी (ता.२२) सकाळी घडली. शंकर लक्ष्मण डोरले (वय ३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  

मृत शेतकरी शंकर लक्ष्मण डोरले व संबंधित आरोपींचा शेतीचा अंतर्गत वाद होता. या वादावरून शंकर डोरले यांची कुऱ्हाडीने हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी ए.जी.खान यांनी घटनास्थळी भेट दिली. लक्ष्मण गणपती डोरले यांच्या फिर्यादीवरून आरोपी गणेश रामकिसन डोरले, अंबादास उर्फ बाबूशा नामदेव घोंगडे, विठ्ठल नामदेव घोंगडे, ज्ञानेश्वर किसन बोरगड, मारोती विठ्ठल डोरले, रामकिसन पंडिता डोरले, नामदेव तुकाराम घोंगडे सर्व रा. राहोली बु. यांच्या विरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सुडके करीत आहेत.