Fri, Apr 23, 2021 13:34
'चोराच्या उलट्या बोंबा', फडणवीसांच्या टीकेला जयंत पाटलांचे उत्तर

Last Updated: Mar 08 2021 4:03PM

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (दि. ८) सभागृहात सादर केला. दरम्यान, या अर्थसंकल्पावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. या टीकेदरम्यान त्यांनी राज्याने पेट्रोल आणि डिझेलवरील कर माफ करून लोकांना दिलासा दिला नाही, असा आरोप केला. या आरोपावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जोरदार टीका करताना चोराच्या उलट्या बोंबा, असे म्हणत केंद्र सरकारकडे बोट दाखवले.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर रद्द करून सामन्य माणसांना दिलासा दिला नाही, अशी टीका केली. त्यांनी पेट्रोल डिझेलवर एकही पैसा कमी केला नाही, त्यामुळे सरकारला पेट्रोल-डिझेलच्या भावावर बोलण्याचा अधिकार नाही, असे वक्तव्य केले.

याबाबत मंत्री जयंत पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी 'चोराच्या उलट्या बोंबा, दुसरं काय? राज्यांना त्यांच्या महसूलात तूट करण्याचा सल्ला देण्यापेक्षा त्यांनी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील त्यांचे कर रद्द करावेत.' असे प्रत्युत्तर दिले.