Sat, Oct 31, 2020 15:39होमपेज › Marathwada › शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये द्या : संभाजीराजे छत्रपती

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये द्या : संभाजीराजे छत्रपती

Last Updated: Oct 18 2020 5:35PM
उस्मानाबाद : पुढारी ऑनलाईन 

राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नूकसान झाले आहे. काढणीला आलेली पिक वाया गेली आहेत. सोयाबीन, भात या पिकांचे मोठे नूकसान झाले. शेतकरी भरपाईची मागणी करत आहेत. राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही शेतकऱ्यांना मदतीची मागणी केली आहे. 

छत्रपती घराण्याची शेती तुळजापूरात आहे. या शेतीचसुध्दा नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. आम्हाला नुकसान भरपाई नको. पण मराठवाड्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये सरकार ने तात्काळ जाहीर करावी. अशी मागणी  खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. 

आज सकाळी तामलवाडी येथून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अतिवृष्टी नुकसान पाहणी दौऱ्याला सुरवात केली. शेतीच्या नूकसानीचा भेट देवून आढावा घेतला. अतीवृष्टीमूळे अनेकांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. पुर्ण पिक वाहून गेल्यासारखी स्थिती आहे.संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे निर्देश दिले आहेत. पण, सरकारी दिरंगाईचा फटका बळीराजाला बसू नये इतकीच विनंती. असेही त्यांनी म्हटले आहे.

शेतीच्या बांधावर व घरात जाऊन  दिला आधार

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी, गंदोरा, सलगरा, किलज आदी गावातील अतिवृष्टीमुळे झालेले शेती, रस्ते व घरांच्या नुकसानीची पाहणी करून माहिती जाणून घेतली. तुळजापूर तालुक्यातील किलज गावात सलग दोन दिवस झालेल्या जोरदार पावसाने नदीकाठावरील अनेक घरे ही चक्क जमीनदोस्त झाली आहेत.गावातील अनेकांच्या घरात नदीचे पाणी गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.

गावातील नदीलगत असलेलल्या पंडित पटणे, शांतिर पटणे, वसंत राजमाने व महादेव पटणे यांची घरे पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबर वाहून गेली आहेत. घरातील सर्व भांडी, पत्रे, वस्तू, शेतमाल, कपडे वाहून गेले. तर शेताचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही सर्व परिस्थिती पहिल्यानंतर संभाजीराजेंनी तात्काळ आवश्यक ती मदत द्या सल्ला अधिकाऱ्यांना दिला.

राजे आले आणि जीवन जगण्याचा आधार मिळाला

संभाजीराजे यांनी किलज गावातील घरे पुरात वाहून गेलेल्या कुटुंबाला भेट देऊन त्यांचे गाऱ्हाणे जाणून घेतले. संभाजीराजेंनी आपल्या खास शैलीत जागेवरून फोन करून 'तत्काळ नुकसानग्रस्त नागरिकांना मदत करा वरील पातळीवर काही बोलायचे असेल तर मी बोलेन पण त्यांचे जीवन सुरळीत करा' असे सजग दिल्याने नुकसानग्रस्तांना जगण्याचा आधार मिळाला.

 "