Sat, May 30, 2020 05:21होमपेज › Marathwada › शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी केंद्राकडे पाठ पुरावा करणार : खा . हेमंत पाटील

शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी केंद्राकडे पाठ पुरावा करणार : खा . हेमंत पाटील

Last Updated: Nov 11 2019 1:33AM
उमरखेड : तालुका प्रतिनिधी 

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. कापूस, सोयाबीन, तुरीसह, ज्वारीच्या पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांना परिपुर्ण आर्थिक मदत मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपूरावा करू, तसेच येणाऱ्या संसदेच्या आधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करु, असे खासदार हेमंत पाटील यांनी शुक्रवारी (ता.८)  उमरखेड येथे शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगीतले. 

पिकविमा कंपनीने गेल्या तीन वर्षांपासुन लुबाडले आहे. अश्या पिक विमा कंपन्याना शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येणार आहे. उमरखेड तालुक्यात सन २०१७-१८ ते २०१९-२० पर्यंत शेतकऱ्यांना विमा कंपनीने छळले आहे. नुस्त्या त्रुटी काढल्याने ऑनलाईन अर्ज भरण्यात शेतकऱ्यांचा वेळ खर्च केला. पण ग्रामीण भागात शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात आहे. लोकसभा मतदारसंघातील, नांदेड, हिंगोली व यवतमाळ या तिन्ही जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे चालु आहेत. 

ग्रामीण भागात ग्रामसेवक, तलाठी, कुषी सहाय्यक हे पंचनामे करीत आहेत. दहा तारखेपर्यंत हे पंचनामे पुर्ण होतील. त्यानंतर मिळालेल्या आकडेवारी वरून भरपाई देण्या बाबतच्या उपाय योजना करण्यात येणार आहे. केद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण योजनेतून शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मिळाली पाहीजे यासाठी प्रयत्न करू. तसेच उमरखेड तालुक्यात ६६  हजार २२८  हेक्टर क्षेत्रावर खरीपाची शेती आहे. तर महागावमध्ये पेरणी३३ हजार ६२५ हेक्टर क्षेत्र आहे.  

बहुतांश ठीकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले त्यामुळे शेती व पीकाचे मोठ्या प्रमाणावर नकसान झाले. या शेतकर्‍यांना पिक विम्याच्या माध्यमातुन सहकार्य करण्याऐवजी या तीन वर्षात शेतकऱ्यांचे विमा कंपनीने ५०० कोटी रूपये लुटले. पीक विमा कंपनीला अभय कोण देत आहे?. हा प्रश्न खासदार पाटील यांनी उपस्थित केला.  

सुरवातीला त्यांनी तहसिल कार्यालयाच्या सभागृहात उमरखेड व महागाव तालुक्यातील नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस, तहसीलदार रुपेश खांडरे तालुका कृषी अधिकारी समाधान धुळधुळे गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे  जि प सदस्य  चिंतागराव कदम, रामराव पाटील, उपनगराध्यक्ष  अरविंन्द भोयर, संदीप ठाकरे ,सतिष नाईक, बळीराम मुटकुळे, कैलास कदम, राहुल सोनुने, प.स.सदस्य गजानन सोळंके, कपील चव्हाण आदी शिवसैनिक उपस्थित होते.