Thu, Sep 24, 2020 11:33होमपेज › Marathwada › हिंगोली : तीन वर्षाच्या चिमुकलीचा खून करणार्‍या पित्यास जन्मठेपेची शिक्षा

हिंगोली : तीन वर्षाच्या चिमुकलीचा खून करणार्‍या पित्यास जन्मठेपेची शिक्षा

Last Updated: Jan 22 2020 7:35PM

संग्रहित फोटोहिंगोली : पुढारी वृत्तसेवा 

खर्चाला पैसे का देत नाहीस, या कारणावरून पत्नीला मारहाण करीत तीन वर्षीय मुलीचा जमिनीवर आपटून खून करणार्‍या पित्यास हिंगोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि दहा हजार रूपयांचा दंड ठोठावला. हा निकाल जिल्हा सत्र न्यायाधिश एन.बी. शिंदे यांनी आज (ता.२२) सुनावला. 

अधिक वाचा : परभणी : शॉर्टसर्किटने फ्लॅटला आग, लाखोंचे नुकसान

सेनगाव तालुक्यातील म्हाळशी येथील विश्‍वनाथ कुंडलिक पांढरे यांनी आपली पत्नी रेणुकाबाई यांना १० फेब्रुवारी २०१७ रोजी खर्चाला पैसे का देत नाहीस या कारणावरून चुल पेटविण्याच्या लोखंडी फुकणीने मारहाण केली. तसेच तीन वर्षीय मुलगी ईश्‍वरीच्या पायाला धरून जमिनीवर आपटल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यावेळी पांढरेने पत्नी रेणुकाबाईसह मुलीस डांबुन ठेवले. दुसर्‍या दिवशी मुलीस वाशिम येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी रेणुकाबाई विश्‍वनाथ पांढरे यांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात १७ फेब्रुवारी २०१७ रोजी तक्रार दिली. 

अधिक वाचा : पाथरीच जन्मस्थळ, समिती नेमावी

त्या तक्रारीवरून विश्‍वनाथ कुंडलिक पांढरेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास करून पोलिस उपनिरीक्षक ए.एन. चिलांगे यांनी हिंगोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.बी. शिंदे यांच्यासमोर चालले. दोन्ही बाजुचा युक्‍तीवाद ऐकून न्यायाधीश एन.बी. शिंदे यांनी आरोपी विश्‍वनाथ कुंडलिक पांढरेला दोषी ठरवून जन्मठेप आणि १० हजार रूपये दंड ठोठावला. दंड भरला नाही तर अधिकची १ वर्ष सक्‍तमजुरी अशी शिक्षा सुनावली. 

अधिक वाचा : अ‍ॅपे उलटून महिला जागीच ठार

सरकारी पक्षाच्या वतीने या प्रकरणात एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी फिर्यादी रेणुकाबाई विश्‍वनाथ पांढरे, साक्षीदार डॉ. नरेश उदगीरे, डॉ. नरेश सुर्यवंशी, शिवाजी  गवळी, तपासिक अंमलदार आशिष चिलांगे यांचे साक्ष महत्वपुर्ण ठरली. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सहाय्यक सरकारी वकील एन.एस. मुटकुळे यांनी बाजु मांडली. त्यांना एस.डी. कुटे, श्रीमती एस.एस.देशमुख यांनी सहकार्य केले.

 "