दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीला जन्मठेप

Last Updated: Nov 28 2020 5:58PM
Responsive image
file photo


लोहा : पुढारी वृत्तसेवा

लोहा तालुक्यातील अंतेश्वर येथे दारूसाठी पत्नीने पैसे दिले नाही म्हणून पतीने रॉकेल टाकून पत्नीला जिवंत जाळल्याची झालेल्याची घटना ९ जानेवारी २०१६ रोजी घडली होती. या प्रकरणी कंधारच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

हिंगोली : सतीश चव्हाण विजयाची हॅट्रिक करणार : अब्दुल सत्तार 

लोहा तालुक्यातील अंतेश्वर येथे ९ जानेवारी २०१६ रोजी माणिका धोंडिबा जोगदंड याने आपली पत्नी चांद्रभागाबाईला दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून रॉकेल टाकून पत्नीला जिवंत जाळले होते. या प्रकरणी सोनखेड पोलिसांनी सबळ पुरावे कोर्टात सादर केले. त्यावरून कंधारच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश अतूल सलगर यांनी पती माणिका धोंडिबा जोगदंड याला जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास अधिक ३ महिन्याची साधी कैदेत ठेवावे असे म्हटले आहे. याबाबत सोनखेड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पांडुरंग मुकुंदराव क्षीरसागर (रा. आडगाव ता. लोहा) यांची बहीण चांद्रभागाबाई यांचा विवाह अंतेश्वर (ता. लोहा) येथील माणिका धोंडिबा जोगदंड (वय ४३ वर्ष धंदा - शेती)  यांच्याशी झाला होता. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. यातूनच त्यांच्या दोघांत कायम वाद होत होता. 

नांदेड : हजारो जनसमुदायांच्या साश्रुनयनांनी अनंतराव देवसरकर अनंतात विलीन

दरम्यान पती माणिका जोगदंड याने ९ जानेवारी २०१६ रोजी पत्नी चांद्रभागाबाई हिला दारूसाठी पैसे मागितले. नवऱ्याच्या त्रासाला वैतागलेल्या पत्नीने पैसे नाहीत असे सांगताच, पती माणिका याने रागात पत्नी चंद्रभागा हिच्या अंगावर रॉकेल टाकले आणि जिवंत जाळले. त्यानंतर आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी चंद्रभागा हिला लागलेली आग विझवली. मात्र चंद्रभागाबाई गंभीर भाजल्या होत्या. त्यांना विष्णुपुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर याप्रकरणी भाऊ पांडुरंग मुकुंद क्षीरसागर (रा. आडगाव, ता. लोहा) यांने आपल्या बहिणीस तिच्या पतीने जिवंत जाळल्याची फिर्याद सोनखेड पोलिसात फिर्याद दिली. फिर्याद मिळताच सहायक पोलिस निरीक्षक दतात्रय शिंदे त्यांचे रायटर जमादार उत्तम डोईबळे (ब.क१६२४) यांनी सविस्तर पुरावे शब्दबद्ध करत कंधारच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायायात सादर केले. याप्रकरणी सरकारी वकील अॅड. कागणे यांनी बाजू मांडली. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी झाली, साक्षी पुराव्यावरून न्यायालयाने अतुल सलगर यांनी आरोपी माणिका धोंडिबा जोगदंड यास जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. याप्रकरणी बीट जमादार दासराव भुते, पो.हे.का साखरे, जमादार एम. डी. शेख, पैरवी अधिकारी शिवाजी केंद्रे, चालक पो.हे.कॉ वेदपाठक यांनी सहकार्य केले.

सीरमची आग दिल्लीत पोहोचली! केंद्रीय तपास यंत्रणांनी मागवला अहवाल 


वाई हत्याकांड प्रकरण : माफीचा साक्षीदार ज्योती मांढरेला कोर्टात चक्कर


मुंबई विद्यापीठातील कुलसचिव नेमणुकीच्या वादात राज्य सरकारला दणका!


राहुल गांधी सोडून काँग्रेस अध्यक्षपदासाठी 'यांच्या' नावाची चर्चा?


भाजपचे अनेक बडे नेते महाविकास आघाडीतील पक्षांच्या संपर्कात : गृहमंत्री अनिल देशमुख


अखेर दहावी आणि बारावीच्या परिक्षांचा मुहूर्त ठरला! 'या' महिन्यात होणार परीक्षा


आगीचा परिणाम कोरोना लस निर्मितीवर होणार का? सिरम इन्स्टिट्यूटने केला खुलासा


'मिर्झापूर' वेब सीरिजच्या निर्मात्यासह ॲमेझॉन प्राईमला सुप्रीम कोर्टाची नोटीस


उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, '...अजूनही समाजातील वैचारिक गुलामगिरी संपलेली नाही' 


बिग ब्रेकिंग : कोरोना लस बनवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागली आग