Thu, Jul 02, 2020 17:32होमपेज › Marathwada › लातूर भाजपाचे २८ नगरसेवक गोव्याच्या सहलीवर

लातूर भाजपाचे २८ नगरसेवक गोव्याच्या सहलीवर

Published On: May 17 2018 11:54PM | Last Updated: May 17 2018 11:53PMलातूर : प्रतिनिधी

उस्मानाबाद , लातूर व बीड मतदारसंघ निवडणुकीची चुरस वाढली असून कोणताही दगा फटका होऊ नये म्हणून भाजपाने त्यांचे २८ नगरसेवक सहलीवर पाठवले आहेत. हे नगरसेवक पुण्यात पोहचले असून शनिवारी ते गोव्यात दाखल होणार आहेत. मतदान दिवशीच या या तीन जिल्ह्यातील ही निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले असून भाजपा व राष्ट्रवादीमुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. बुधवारी सायंकाळी राजस्थानात विद्यालयात दोन लक्झरी बसेस व नगरसेवक आले होते. ही बातमी कळताच काही नागरीक व पत्रकारांनी ते विद्यालय गाठले व नगरसेवकांची भंबेरी उडाली.

काहीनी तर कॅमेऱ्यापासून आपले चेहरे लपवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पत्रकारांनी चौकशी केली असता भाजपाचे लातूर शहर व जिल्हाअध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी हे नगरसेवक हे पुण्याला प्रशिक्षणसाठी चालले आहेत असे सांगितले. भाजपाचे ३९ नगरसेवक असून त्यातील २८ जणांनाच सहलीवर पाठवले असून या नगरसेवकांबद्दल शंका असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान हा प्रकार म्हणजे पक्षनेतृत्वाने आपल्याच नगरसेवकावर दाखवलेला अविश्वास आहे.

भाजपाचे ९ नगरसेवक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या उमेदवारास मतदान करण्यास इच्छुक आहेत. भाजपाला त्यांचा पराभव दिसत असून स्वताची अब्रू वाचवण्याचा हा त्यांचा शेवटचा केवीलवाणा प्रयत्न असल्याची टिका काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी केली.