Sat, Jul 11, 2020 11:01होमपेज › Marathwada › वाशिम : गरजू मजुरांना सॉनिटायझर, मास्कचे वाटप  (video)

वाशिम : गरजू मजुरांना सॉनिटायझर, मास्कचे वाटप (video)

Last Updated: Jun 30 2020 4:38PM

सॉनिटायझर आणि मास्क वाटप करताना आमदार लखन मलिकवाशिम : प्रतिनिधी 

कोरोना महामारीच्या युद्धात आपल्या देशात संपूर्ण लॉकडाऊननंतर आता अनलॉक २मध्ये तळ हातावर पोट असणारे गरीब बांधकाम मजूर लोक कामावर जात असतात. कोणत्याही सुरक्षेविना त्यांना कामावर जावे लागते. या मजुरांना महाग असलेले सॉनिटायझर आणि मास्क घेणे परवडत नाही. यामुळे वाशिममधील मंगरूळपीर मतदार संघाचे भाजप आमदार लखन मलिक यांनी पुढाकार घेऊन आज वाशिम व मंगरूळपीर या दोन्ही ठिकाणी आपल्या मतदार संघात बांधकाम मजुरांना सॉनिटायझर, मास्क आणि इतर साहित्याचे वाटप केले. यामुळे आमदार लखन मलिक यांनी बांधकाम मंजूरांना मदतीचा हात  दिला आहे. 

वाचा : उस्मानाबाद : दमदार पावसाने कसबे तडवळे परिसरात दाणादाण 

वाशिम शहरातील जुना रिसोड नाका चौकात तर मंगरूळपीर येथील अकोला नाका चौकातील हजारोच्या संख्येने कामाच्या शोधत कामगार आणि मजूर येत असतात. यांना कामावर जाण्यापूर्वी स्वतःची काळजी घेता यावी म्हणून आमदार लखन मलिक यांनी स्वत: पुढाकार घेऊन या सर्वांना सॉनिटायझर, मास्क व इतर सुरक्षेचे साहित्य वाटप केले आहे. 

वाचा : 'तरीही पेट्रोल-डिझेल का महागते'?
 

यावेळी भाजप आ. लखन मलिक, प्रा. दिलीप जोशी, योगेश देशपांडे, नगरसेवक गौतम सोनोने, नगरसेवक भीमकुमार जीवनानी, समाजसेवक धनंजय हेंद्र, जीवन अग्रवाल, धनंजय रनखांब यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या सामाजिक उपक्रमात भाग घेतला होता.