Mon, Apr 06, 2020 06:30होमपेज › Marathwada › बीड : परवाने नसल्याने ग्रामीण भागात दुकानदार अडचणीत

बीड : परवाने नसल्याने ग्रामीण भागात दुकानदार अडचणीत

Last Updated: Mar 26 2020 1:29PM

संग्रहित छायाचित्रनेकनुर (बीड) : मनोज गव्हाणे

शहरे शटडाऊन असल्याने शिवाय वाहतुकीवर निर्बंध असल्याने ग्रामीण भागात छोट्या किराणा व्यावसायिकांना दैनंदिन लागणारा किराणा माल आणण्यासाठी चांगलीच अडचण निर्माण झाली आहे. यातच अनेकाकडे दुकानांचे परवाने नसल्याने माल आणायचा कसा आणि कोठून असा प्रश्न पडला आहे. अनेक गावांमध्ये तेल, साखरेचे वांदे होत आहेत.

ग्रामीण भागात असणाऱ्या किराणा दुकानदाराकडे मोजकाच माल असतो. तालुक्याच्या किंवा जवळच्या बाजारपेठेच्या ठिकाणाहून माल आणणे आणि तो सकाळ संध्याकाळ विकणे असा चालणारा व्यवसाय चार दिवसांपासून सुरू झालेल्या संचारबंदीने अडचणीत आला आहे.

दुकानातील होता तो माल संपल्याने नवीन माल आणण्यासाठी जागोजागी असलेली यंत्रणा जाऊ देईल, याची कुठलीच शाश्वती नाही. शिवाय विक्री परवाने नसल्याने अनेक दुकानदारांनी दुकानांना कुलूप लावणे पसंत केले. या दुकानदाराकडे परवाने नसल्याने खरेदीसाठी बाहेर जाणे अवघड बनले. यामुळे गावागावात आवश्यक असलेल्या किराणा मालाची टंचाई निर्माण होऊ लागली आहे.