Wed, Sep 23, 2020 22:44होमपेज › Marathwada › नांदेड : बारडमध्ये कार्तिक मास सोहळा उत्साहात

नांदेड : बारडमध्ये कार्तिक मास सोहळा उत्साहात

Last Updated: Nov 16 2019 2:00AM

बारड येथे कार्तिक मास सोहळा उत्साहात साजराबारड (नांदेड) : प्रतिनिधी 

बारड नगरीत सर्वधर्मीय लोकांच्या वतीने लखलखत्या दिव्यांच्या उजेडात, टाळ-मृदंगाच्या गजरात सामुहिक काकडा आरती सोहळा पार पडला. तर यावेळी भक्तजनांना पुरणपोळी महाप्रसादाचे वाटप ही करण्यात आले आहे. कार्तिक मास महिन्याच्या सांगता सोहळ्यात गावातील महिला आणि युवक  भक्तांनी सहभाग घेतल्याने सामुहिक नामस्मरणाने भक्तिमय वातावरण तयार झाले होते.

कार्तिक मास महिन्यानिमित्त हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर, शितलादेवी मंदिर, कृष्ण मंदिर, बालाजी मंदिर, शिवालय मंदिर तसेच जैन मंदिर येथे भक्तांच्या उपस्थितीत काकडा आरतीसह महापूजा घेण्यात आली. मारुती मंदिरात कार्तिक मास सांगता सोहळ्याचे बुधवार (दि. १३) रोजी आयोजन करण्यात आले. यानिमित्त पोलिस पाटील यशवंतराव लोमटे, गणेश वच्छेवार, राजेंद्र लालमे यांच्या हस्ते पुजा करण्यात आली. बजरंग फूलारी, नारायण चव्हाण, पांडुरंग लोणवडे, शिवाजी लखे, श्रीरंग कौसे, परसराम पंचाळ त्यांच्यासह वारकरी संतांनी टाळ-मृदंगाच्या गजरात सामुहिक काकडा महाआरती करण्यात आली. तसेच तुळशी विवाह सोहळा मारुती मंदिर संस्थानचे अध्यक्ष सुरेश देशमुख सपत्नीक यांच्या उपस्थितीत पार पडला.

हनुमान मंदिरात संस्थानच्यावतीने फुलांची सजावट तसेच मंदिर परिसरात रोषणाई करण्यात आली होती. आकर्षक रांगोळी, फुलांची सजावट अतिषबाजीने परिसर फुलून गेला होता. कार्तिक मास सांगता सोहळ्यात काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष उद्धवराव पवार, पंचायत समिती उपसभापती आनंदराव पाटील, वाडा भाऊराव चव्हाण कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास संचालक शिवाजीराव पाटील, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, माजी उपसभापती सुनील देशमुख, सरपंच प्रतिनिधी विलास देशमुख, काँग्रेस जिल्हा सल्लागार उत्तमराव लोमटे, विविध कार्यकारी सेवा समिती सोसायटी अध्यक्ष रघुनाथराव देशमुख, विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, वनपरिक्षेत्र अधिकारी के. डी. देशमुख, राजगोपाल सोसायटी उपाध्यक्ष माधव भीमेवार, बालाजी लोणवडे, डी. के. तोटेवाड, सारंग स्वामी विजय पाटील, मदर सिंग ठाकूर, नर्सिंग आठवले, दिलीपराव करे, राहुल आठवले हिरामण पाटील, सखाराम लकी, बालाजी माने देशमुख आनंदराव देशमुख यांच्यासह सर्व धर्मीय भक्तांचे उपस्थिती होती.

कार्तिक मास सांगता सोहळ्यात भक्तगणांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. गावातील हनुमान भक्तांनी पुरणपोळी महाप्रसादाचा मानस व्यक्त केला होता. महाप्रसाद वनपरिक्षेत्र अधिकारी के. डी. देशमुख, घुमाया पुल्लवर, सुरेश लोणवडे मित्र मंडळ, सुनील देशमुख, संतोष देशमुख, उद्धवराव माने, वीरेंद्र देशमुख, प्रकाश संगेवार, रामदास कत्रे बालाजी रॅपनवाड, सचिन कनसेटे, आनंदा पवार, विनोद कोरे मित्र मंडळ, संदीप शिंगणे, नागेश रत्नपारखी, नागेश कत्रे रवी कराळे, अशिष देशमुख, राघोजी देशमुख, संतोष आठवले, शेख मेहबूब, राज देशमुख, बालाजी बच्चेवार, प्रभाकर भीमावर, अरविंद पाथरकर, परमेश्वर भीमावर, श्याम लोमटे, परमेश्वर कोरबंवड, रंगराव देशमुख, किशोर पिलेवडा, प्रतीक चवरकर, गोविंद काळकोटे, स्वप्नील येमले, चेतन दरबेसवार यांच्यावतीने आयोजन करण्यात आले होते.

कार्तिक मास सांगता सोहळा यशस्वीतेसाठी संस्थांचे अध्यक्ष सुरेश देशमुख, उपाध्यक्ष प्रताप देशमुख, सचिव गंगाधर कोरबंवड, सहसचिव योगेश रत्नपारखी, कोषाध्यक्ष राजेंद्र लालमे, विनायक देशमुख, यशवंतराव लोमटे, श्रीराम कोरे, बिहारी दरक, संदीप गवळी, अशोक लोणी, शिवाजी गवळी राजाराम फुलारी, शिवाजी फुलारी, शरद कवळे, अशिष देशमुख, राजे गणेश लोणे, वैभव इरलेवाड, बालाजी सूर्यवंशी, दीपक भोकरे, रामराव नामदेव बच्चेवार, संजय पेंदे यांच्यासह जय मल्हार युवा मित्र मंडळ, वीरशैव युवा मित्र मंडळ, छावा मराठा युवा संघटना, सिद्धेश्वर युवा मित्र मंडळ गावातील महिलांनी परिश्रम घेतले.

 "