Mon, Sep 21, 2020 11:27होमपेज › Marathwada › जिंतूर : प्राणी मित्राच्या सतर्कतेने कावळ्याच्या हल्‍ल्‍यातून श्रृंगी घुबडाची सुटका

जिंतूर : प्राणी मित्राच्या सतर्कतेने कावळ्याच्या हल्‍ल्‍यातून श्रृंगी घुबडाची सुटका

Last Updated: Jul 05 2020 4:17PM
जिंतूर : पुढारी ऑनलाईन 

जिंतुर येथे राहुल देशमुख यांच्या शिवारात श्रृंगी घुबडावर काही कावळ्यांच्या कळपाने हेरून हल्ला चढवला. यावेळी कावळ्यांनी घुबडाला चांगलच घायाळ केले. हे चित्र राहुल देशमुख यांनी पाहिले. यावेळी त्‍यांनी धावुन जात त्‍या जखमी घुबडाची कावळ्यांच्या तावडीतून सुटका केली.

देशमुख यांनी शहरातील पक्षीमित्र अनिल उरटवाड यांच्याशी संपर्क साधुन श्रृंगी घुबड (Indian Eagle Owl) पक्षीमित्राच्या स्वाधीन केले. चार दिवस या घुबडाची योग्य काळजी घेऊन त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडुन देण्यात आले.

घुबडाविषयी असलेल्या अंधश्रध्दा 

पक्ष्यांच्या विश्वात बदनाम झालेला पक्षी म्हणजे घुबड. एखाद्या घरात घुबड दिसून आला, तर त्या घरात काहीतरी अपशकुन घडणार असे म्हटले जाते. घुबडाचे तोंड बघू नये, ज्या कामासाठी आपण जातो ते काम होत नाही. घुबडाचे तोंड अशुभ मानले जाते. या अशा प्रकारच्या अंधश्रध्दा, गैरसमजातून घुबड प्रजाती बळी पडत आहेत.

जगभरात घुबडाच्या सुमारे २०० हून अधिक जाती आहेत. घुबडाला आपली मान २७० अंशात फिरवता येते. घुबडाच्या पंखाची रचना अशी असते की ते उडतांना जरासुध्दा आवाज येत नाही.

 "