Sun, Jul 05, 2020 01:59होमपेज › Marathwada › जालना : अंबड शहरात दोन बुथवर ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड

जालना : अंबड शहरात दोन बुथवर ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड

Published On: Apr 23 2019 5:35PM | Last Updated: Apr 23 2019 5:35PM
अंबड : प्रतिनिधी

जालना लोकसभेसाठी मतदान चालु असताना अंबड शहरातील दोन बुथवरील ईव्हिएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. मात्र वेळीच निवडणुक विभागाच्या झोनल पथकाने धाव घेवून एका बुथवरील ईव्हिएम मशिन बदलले. तर दुसऱ्या बुथवरील मशिन दुरुस्त करण्यात आले आहे.

जालना लोकसभा निवडणुक ही तिसऱ्या टप्पातील मतदान सुरू आहे. यात अंबड शहरातील बुथ केंद्र २९९ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रा.शाळा, अंबड) येथे सकाळी ७ ते ७.१५ वाजण्याच्या सुमारास ईव्हिएम मशिनचे बटन जाम झाले होते. तेव्हा निवडणुक झोलन पथकाने तेथील ईव्हिएम मशिन बदलून मतदान सुरळीत केले. 

तर बुथ केंद्र २८९ (दत्ताजी भाले शाळा, अंबड) येथे दुपारी ११.३०ते १२.०० वाजण्याच्या सुमारास ईव्हिएम मशिनच्या व्हिव्हिपॅडमध्ये तांत्रिक अडचण आली होती. त्यानंतर तेथील ईव्हिएम मशिन तात्काळ दुरुस्त करण्यात आले आहे. मशिनमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने काही काळ मतदारांच्या रांगादेखील लागल्या होत्या.