होमपेज › Marathwada › परळी : तिन्ही राम मंदिरांच्या सुरक्षेत वाढ

परळी : तिन्ही राम मंदिरांच्या सुरक्षेत वाढ

Last Updated: Nov 07 2019 6:58PM

परळीत तीनही राम मंदिरांच्या सुरक्षतेत वाढपरळी वैजनाथ : प्रतिनिधी 

अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोणत्याही क्षणी लागणे अपेक्षित आहे. त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात तसेच जिल्हाभरात हाय अलर्ट जारी केलेला आहे. कुठलीही अनपेक्षित घटना होऊ नये यासाठी परळी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. नाशिक प्रमाणे वैजनाथाच्या पावन भूमीतही गोराराम, काळाराम आणि सावळाराम असे तीन मंदिरे आहेत. या तिन्ही मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

शहरात असलेल्या गोराराम मंदिर, काळाराम मंदिर आणि सावळाराम मंदिर अशा तीनही राम मंदिरात पोलिसांनी बंदोबस्त लावल्याने मंदिर परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. अयोध्या राम जन्म भूमी प्रकरणाचा निकाल कुठल्याही क्षणी येऊ शकतो. म्हणूनच शहरातील राम मंदिरांच्या सुरक्षतेत वाढ करण्यात असल्याचे दिसते. निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राखण्याचे आवाहन परळी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत कदम आणि संभाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बालासाहेब पवार यांनी केले आहे.

या प्रकरणी येणारा निकाल हा देशातील सर्वोच्च न्यायसंस्थेकडून येणारा आहे. त्यामुळे त्याचा आदर सर्वांनी करणे गरजेचे आहे. असे ते म्हणाले. तसेच शहरात कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही तसे आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले.