Mon, Jul 06, 2020 05:47होमपेज › Marathwada › नांदेडमध्ये ११ पर्यंत २४.०६ टक्‍के मतदान

नांदेडमध्ये ११ पर्यंत २४.०६ टक्‍के मतदान

Published On: Apr 18 2019 12:17PM | Last Updated: Apr 18 2019 12:16PM
नांदेड : प्रतिनिधी 

लोकसभेच्या दुसऱ्या टप्यात नांदेड लोकसभा मतदार संघात मतदानाला शांततेत सुरवात झाली. अकरा वाजेपर्यंत 24.06 टक्के मतदान झाले आहे. सकाळच्या सत्रामध्ये काँग्रेसचे उमेदवार खासदार अशोक चव्हाण यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला, तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. यशपाल भिंगे यांनी सुद्धा सहपत्नीक मतदान केले.

नांदेड लोकसभेसाठी 2 हजार 28 मतदान केंद्रावर मतदानास सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरवात झाली. या निवडणुकीसाठी 17 लाख 17 हजार 825 मतदार आहेत. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन वयस्क मतदारांनी सकाळीच मतदानास जाणे पसंत केले. 

यामुळे महिला तसेच वयस्‍क मंडळींनी मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लावल्‍याचे चित्र दिसत होते.