होमपेज › Marathwada › नांदेड : देगलुरात पती-पत्नीचा कोरोनाने मृत्यू 

नांदेड : देगलुरात पती-पत्नीचा कोरोनाने मृत्यू 

Last Updated: Jul 05 2020 8:38PM
नांदेड : पुढारी वृत्तसेवा

देगलूर शहरातील गुंब्द बेस भागातील पती-पत्नीचा कोरोनाने अवघ्या दोन दिवसाच्या अंतराने मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान प्रशासनाने रविवारी (दि. ५ जुलै) बाधित पती-पत्नीच्या निवास्थान परिसराचा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला व तो भाग सील करण्यात आला. याबाबतची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. 

अधिक वाचा : जिंतूर : प्राणी मित्राच्या सतर्कतेने कावळ्याच्या हल्‍ल्‍यातून श्रृंगी घुबडाची सुटका

बाधीत पती-पत्नीच्या कुटुंबातील जवळून संपर्क आलेल्या पाच जणांना देगलूर येथील कोविड सेंटर मधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर दुसऱ्या एका मुलीला नांदेड येथील कोविड सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले. 

अधिक वाचा : वाशिम: कार-कंटेनरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

दरम्यान पत्नीची तब्येत बिघडल्याने पतीने पत्नीला उपचारासाठी नांदेड येथे गेल्या आठवड्यात दाखल केले होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर लागलीच पत्नीचे निधन झाले व त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर शुक्रवारी (दि.3) पतीची तब्येत बिघडल्याने त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले व त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला. स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे शनिवारी (दि. ४) स्पष्ट झाले. दरम्यान रविवारी (दि. ५ ) पहाटे पतीचेही निधन झाले. 

अधिक वाचा : हिंगोलीत बाधितांची संख्या त्रिशतकाकडे