Fri, Jul 03, 2020 16:52होमपेज › Marathwada › महादेव जानकर यांनी धरला मिरवणुकीत ठेका(video)

...आणि महादेव जानकरांनी धरला ठेका(video)

Published On: May 14 2019 6:10PM | Last Updated: May 14 2019 6:10PM
हिंगोली  : प्रतिनिधी

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त हिंगोली येथे मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत राज्याचे दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांना कार्यकर्त्यांसह सहभाग दर्शविला. यावेळी काही काळ ढोलताशाच्या गजरात मिरवणुकीत त्यांनी ठेका धरला होता.

येथील मराठा शिवसैनिक सेना व छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याच्या वतीने मंगळवारी आयोजित मिरवणुकीत राज्याचे दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांनी हजेरी लावून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. दुपारी ४ च्या सुमारास शहरातील सिटी क्‍लब मैदानातून काढण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे ना.जानकर यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. त्यानंतर काढण्यात आलेल्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जानकर यांनी विनायक भिसे, पप्पू चव्हाण, पंढरीनाथ ढाले यांच्या समोर ढोलताशाच्या गजरात ठेका धरून मिरवणुकीत सहभाग नोंदविला.

त्यानंतर जानकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.