Sat, Jul 11, 2020 11:13होमपेज › Marathwada › उस्मानाबाद : दमदार पावसाने कसबे तडवळे परिसरात दाणादाण 

उस्मानाबाद : दमदार पावसाने कसबे तडवळे परिसरात दाणादाण 

Last Updated: Jun 29 2020 9:21PM
कसबे तडवळे (उस्मानाबाद) : पुढारी वृत्तसेवा 

कसबे तडवळे परिसरात आज (दि. २९ रोजी) दुपारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह सगळ्यांचीच दाणादाण उडाली. सुमारे पंचेचाळीस मिनिटे पडलेल्या दमदार पावसाने गावातील उथळ भागात पाणी साचले. तर शेतातील बांद फुटून माती वाहून गेली आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन पिकांवर पाणी साचल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. 

उस्मानाबादमध्ये कोरोनाने पोलिसाचा मृत्यू

दरम्यान दमदार पाऊस पडल्याने गावातून वाहणारी नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. तर गेल्या पाच वर्षात प्रथमच जून महिन्यात सलग तिसऱ्या वेळेस मोठा पाऊस झाल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र दुसरीकडे झालेले नुकसानीने वाईट वाटत असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. तर पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.