Wed, Jan 20, 2021 00:19होमपेज › Marathwada › दहावी, बारावीचा निकाल 'या' तारखेला लागणार!

दहावी, बारावीचा निकाल 'या' तारखेला लागणार!

Last Updated: Jul 12 2020 1:28AM
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा   

बारावीच्या परीक्षेचा निकाल १५ ते २० जुलै तर दहावीच्या परीक्षेचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून सुरू आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. 

वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, दहावी व बारावीच्या परीक्षांचा निकाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. बारावीच्या परीक्षांचा निकाल १५ ते २० जुलै दरम्यान तर दहावीच्या परीक्षेचा निकाल ३१ जुलैपर्यंत लावण्याचा शालेय शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. शिक्षणमंत्र्यांनी निकालाबाबत सांगितल्याने  निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.