Mon, Jul 06, 2020 22:01होमपेज › Marathwada › फेसबुक लाईव्ह करीत मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

फेसबुक लाईव्ह करीत मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Jan 07 2019 3:57PM | Last Updated: Jan 07 2019 3:54PM
लातूर : प्रतिनिधी

गुड नाईटचे लिक्वीड पिऊन रविवारी रात्री फेसबुक लाईव्ह करत एका युवतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना लातुरमधील औसा रोड परिसरात उघड झाली आहे. येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

रात्री दोनच्या सुमारास फेसबुक लाईव्ह करत आपण आत्महत्या करीत असल्याचे ती सांगत होती. हा प्रकार पाहून याची माहिती नागरिकांनी शिवाजीनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ आत्महत्या करणार्या युवतीच्या घरी दाखल झाले. ही तरुणी एका संघटनेची पदाधिकारी असून तिने तिच्या पदाचा राजीनामा दिला होता. तिला काहीजण त्रास देत असल्याने तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा शहरात आहे.