Tue, Jul 14, 2020 04:41होमपेज › Marathwada › पूर्णा कारखान्याचा बगॅस भस्मसात

पूर्णा कारखान्याचा बगॅस भस्मसात

Published On: Apr 11 2019 2:06AM | Last Updated: Apr 11 2019 12:08AM
वसमत : प्रतिनिधी

पूर्णा सहकारी साखर कारखाना युनिट क्र. 1 च्या बगॅसला मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आग लागली होती. त्यात बगॅस कॅरियर स्ट्रक्‍चरसह बेल्ट मशिनरी साहित्य जळून खाक झाले. लागलेल्या आगीत 20 लाखांच्यावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे.

तब्बल चार तासांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. या कारखान्यास मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास बगॅस कॅरियर स्ट्रक्‍चरला अचानक आग लागली. आगीने पाहता पाहता उग्ररूप धारण केले होते. आग विझविण्यासाठी नगरपालिका अग्‍निशामक दलास पाचारण करण्यात आले होते. आग आटोक्यात आणण्यासाठी कारखाना कर्मचारी व अग्‍निशामक दलाने मोठे प्रयत्न केले. तब्बल चार ते पाच तासांनंतर आग आटोक्यात आली. आगीत बगॅस कॅरियर स्ट्रक्‍चर, केबल, रबर, बेल्ट यासह मशिनरी साहित्य जळून 20 लाखांवर नुकसान झाले आहे. वेळीच सतर्कता बाळगल्याने जीवितहानी झाली नाही. जवळ मोठ्या संख्येने वाहने उभी होती. वाहनाच्या दिशेने आग आली असती तर मोठे नुकसान झाले असते. आग आटोक्यात आणण्यासाठी कर्मचार्‍यांनी मोठी कसरत केली. आगीत झालेल्या नुकसान प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. सदर प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात जळीतची नोंद करून घेण्याचे काम उशिरापर्यंत चालू होते.