Sun, Jul 12, 2020 18:19होमपेज › Marathwada › डिगोळ येथे आगीत ३० एकर ऊस जळून खाक; एका महिलेचा दुर्दैवी अंत 

डिगोळ येथे आगीत ३० एकर ऊस जळून खाक; एका महिलेचा दुर्दैवी अंत 

Published On: Feb 15 2019 10:10PM | Last Updated: Feb 15 2019 10:09PM
लातूर : प्रतिनिधी

रेणापुर (जि. लातूर) तालुक्यातील मौजे डिगोळ ( देशपांडे ) येथे शुक्रवारी दुपारी एक ते दीड च्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत २१ शेतकऱ्यांचा जवळपास ३०­ एकर ऊस जळून खाक झाला झाला. या आगीत एका वयोवृद्ध महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे.

या घटनेची मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी दुपारी एक ते दीडच्या दरम्यान गावालगत उसाच्या शेतीला अचानक आग लागली. वारा असल्याने ही  आग सर्वत्र पसरत गेली. यामुळे जिकडे तिकडे आगीचे आणि धुराचे लोट दिसून येत होते. आगीचे आणि धुराचे लोट पाहून आजूबाजूचे शेतकरी ग्रामस्थ घटनास्थाांळी धावून, त्यांनी ती आग विझवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी उसाच्या शेतीत काम करणारी नागरबाई ग्यानदेव जोगदंड (वय ६५)  वर्षाच्या महिला आगीने चारी बाजूने घेरली गेली. तिला या आगीतून बाहेर येता आले नाही. त्यामुळे त्या गंभीररित्या भाजल्या गेल्या. तात्काळ ग्रामस्थांनी जोगदंड यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाकडे घेऊन जात असताना तिचा वाटतं दुर्दैवी अंत झाला.

उसाची तोड करून ट्रॅक्टरमध्ये उस भरत असताना अचानकपणे आग लागल्याने सर्व मजूर आपला जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावून लागले तर काहीनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीत सगळी  उसाने भरलेल्या  ट्रॅक्टरची ट्रॉली जळून  खाक झाली.

या आगीत दत्तात्रेय जोगदंड, रामभाऊ जोगदंड, अशोक जोगदंड, सचिन जोगदंड दयानंद जोगदंड, नितीन जोगदंड, ज्ञानेश्वर जोगदंड, अंकुश जोगदंड, बळीराम जोगदंड,  भाऊसाहेब जोगदंड,  लिंबूबाई जोगदंड, हनुमंत जोगदंड, मंचक जोगदंड, दिगाबर जोगदंड, अच्युत जोगदंड तुकाराम जोगदंड सुर्यकांत जोगदंड, श्रीरंग जोगदंड, सुनील जोगदंड यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा जवळपास ३० एकर ऊस जळून खाक झाला या आगीत शेतीची अवजारे व इतर शेती उपयोगी साहित्य नष्ट झाली आहेत.

लातूर ग्रामीणचे भाजपा नेते रमेश कराड यांनी घटनास्थळी जाऊन  पाहणी केली व शेतकऱ्यांशी चर्चा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.