Wed, Sep 23, 2020 02:07होमपेज › Marathwada › मुलाला लॅपटॉप देऊ न शकल्याने शेतकऱ्याने केली आत्महत्या

मुलाला लॅपटॉप देऊ न शकल्याने शेतकऱ्याने केली आत्महत्या

Last Updated: Jul 07 2020 1:38AM
उस्मानाबाद : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील बहुला येथील ४२ वर्षीय शेतकरी महादेव बिक्कड यांनी मुलाच्या ऑनलाईन शिक्षणासाठी लॅपटॉप देऊ शकत नाही म्हणून शेतातील झाडाला केबल वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली.

अगोदरच या शेतकऱ्यांने दुबार पेरणी केली असल्याने ते आर्थिक अडचणीत होते. त्यातच कोरोनामुळे सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. त्यासाठी त्यांचा मुलगा गणेशने लॅपटॉपची मागणी केली. सध्या आपण दुबार पेरणीने संकटात आहोत. पुन्हा घेऊ म्हणून ते शेतात गेले ते आलेच नाहीत, असा जबाब कळंब पोलिसात त्यांचा पुतण्या राहुल बिक्कड यांने दिला आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. या घटनेची कळंब पोलिसात नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे तालुकयात हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यातील दुबार पेरणीमुळे ही दुसरी आत्महत्या असुन शैतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

 "