Thu, Jan 21, 2021 02:02होमपेज › Marathwada › शेतकर्‍याची जाळून घेऊन आत्महत्या

शेतकर्‍याची जाळून घेऊन आत्महत्या

Last Updated: Jan 15 2020 1:45AM
गेवराई : प्रतिनिधी

तालुक्यातील ताकडगाव येथील शेतकरी शिवाजी भाऊसाहेब मोटे (वय 52) यांनी सोमवारी रात्री गावाजवळील नदीजवळ अंगावर राँकेल टाकून पेटवून घेतले.उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शिवाजी मोटे शौचास जात असल्याचे सांगून गावाजवळील नदीवर गेले होते. तेथे त्यांनी अंगावर राँकेल टाकून पेटवून घेतले. त्रास होऊ लागल्यावर त्यांनी आरडाओरडा केली असता गावातील लोक धाऊन गेले व विझविण्यासाठी प्रयत्न केला. पेटवून घेतल्यानंतर पाय, हात, चेहर्‍याला वर झळ पोहचली आहे. ग्रामस्थांनी  त्यांना तात्काळ वाहनाने दहा मिनिटात गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. जवळपास 60% भाजले. उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास शेतकरी शिवाजी मोटे यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर गावातील स्मशानभूमीत मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाजी मोटे  यांच्या मागे  पत्नी, एक मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे. उशीरापर्यंत गेवराई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली नव्हती.