Sat, Jul 11, 2020 21:05होमपेज › Marathwada › जिंतूर: मतदान शाईने कर्मचाऱ्याची बोटे जायबंद; कालबाह्य शाई असण्याची शक्यता

मतदान शाईने कर्मचाऱ्याच्या बोटांना त्रास

Published On: Apr 22 2019 5:25PM | Last Updated: Apr 22 2019 5:25PM
जिंतूर: प्रतिनिधी

मतदान केल्यानंतर मतदाताच्या डाव्‍या हाताच्‍या बोटास निवडणूक कर्मचार्‍यांच्‍याकडून शाई लावली जाते. ही शाई बोटाच्‍या वरच्‍या बाजूस लावली जाते. ती काही केले तरी जात नाही. 

जिंतूर येथील डी. टी. राऊत यांच्‍या उजव्या हाताकडील तळहाताच्‍या बाजूकडील बोटावर निवडणूक प्रक्रियेतील शाई लागली. त्‍यामुळे त्यांची बोटे जायबंद होण्याची भीती आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, डी. टी. राऊत यांची पूर्णा तालुक्यातील बलसा येथे पोलिंग ऑफिसर नंबर ३ म्हणून नियुक्ती झाली. ते आपले कर्तव्य बजावण्‍यासाठी निवडणूक कामावर रुजूही झाले. मतदान प्रक्रियेत काम करत असताना त्यांच्या उजव्या हाताच्या तळ हाताच्‍या बाजूच्या बोटात शाही लागली. त्‍यामुळे त्यांना त्याच रात्री सदरील बोटात आग होण्‍याचा त्रास सुरू झाला.

यामुळे त्यांनी जिंतूर येथील डॉ. कान्हेकर व डॉ. लहाने यांच्याकडे उपचार घेतले. १८ एप्रिलपासून  कोणताच फरक न पडल्याने त्यांना परभणीला त्वचा तज्ज्ञांकडे जाण्‍याचा निर्णय घेतला. निवडणूक दरम्यान शासनाकडून मिळणारा भत्ता त्यापेक्षा जास्त खर्च त्यांना त्यांच्या दुखापतीवर करावा लागण्याची वेळ राऊत यांच्यावर आलेली आहे.