Wed, Sep 23, 2020 01:29होमपेज › Marathwada › जालना : वैष्णवी गोरे खून प्रकरणी आरोपीस फाशी देण्याची मागणी

जालना : वैष्णवी गोरे खून प्रकरणी आरोपीस फाशी देण्याची मागणी

Last Updated: Jul 02 2020 3:13PM

निवेदन देताना अखिल भारतीय समता परिषदेचे सदस्य जिंतूर (परभणी) : पुढारी वृत्तसेवा 

जालना जिल्ह्यातील मंठा येथे भर रस्त्यात वैष्णवी गोरेचा आरोपी शेख अल्ताफने अत्यंत क्रूरपणे निर्घृण खून केला होता. या प्रकरणातील आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी येथील अखिल भारतीय समता परिषदेतर्फे लेखी निवेदनाद्वारे प्रशासनास केली आहे. 

वाचा : नांदेड : माजी पंचायत समिती सभापतींची गळफास घेऊन आत्महत्या 

या निवेदनात असे नमूद केले की, रिक्षा चालवून कुटूंबाचा उदरनिर्वाह करणारे गोरे कुटूंबातील वैष्णवी गोरे ही एकुलती एक मुलगी होती. नुकताच तिचा विवाह झालेला होता. विवाह नंतर माहेरी मंठा येथे आलेली असताना शेख अल्ताफ बाबू याने निर्दयीपणे भरचौकात गळा कापून तिचा खून केला. सदरील प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवून दोषी आरोपीस भरचौकात फाशीची शिक्षा देण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल असे ही  निवेदनात नमूद केले आहे.

वाचा : वाशिम : गरजू मजुरांना सॉनिटायझर, मास्कचे वाटप (video)

यावेळी निवेदन देताना अध्यक्ष दत्ताभाऊ काळे, गंगाधर गोरे, गुलाब नहातकर, गणेश काळे, सचिन देशमुख, सुनील गाडेकर, बालाजी शिंदे सोसकर, बाळासाहेब काजळे, नागेश आकात, मंगेश कुर्हे, सुनील डोंबे, पवन देवकर, विजय भांबळे, दत्तराव कटारे, दीपक डोंबे, संतोष पारेकर, अतुल कोकडवार, नितीन दांगट, रमेश धोत्रे आणि ज्ञानदेव काळे आदी उपस्थित होते. या सर्वानी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

 "