Thu, Jan 28, 2021 06:55होमपेज › Marathwada › उस्मानाबाद : उपचाराअभावी एका रुग्णाचा मृत्यू

उस्मानाबाद : उपचाराअभावी एका रुग्णाचा मृत्यू

Last Updated: Aug 02 2020 6:03PM
परंडा : पुढारी वृत्तसेवा

सरकारने ग्रामीण भागातील जनतेसाठी सुरू केलेल्या १०८ रुग्णसेवेचा लाभ गरजूंना मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. स्थानिक ग्रामीण रुग्णालयांतर्गत असणारी या रुग्णवाहिकेत आपत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वनव्यामुळे एकलकोंडी झाली आहे. रुग्णवाहिकेवर डॉक्‍टर नसल्याने रुग्णाला वेळेवर उपचार अभावी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.

वाचा : बीड : बंद वेबसाईटमुळे हजारो शेतकरी विमा भरण्यापासून वंचित 

उत्तम भानुदास बोराडे (वय ६० ) असे मृत रुग्णाचे नाव आहे. १०८ क्रमाकांच्या रुग्णवाहिकेवर दोन डॉक्‍टर व दोन चालक नियुक्त करण्याचे आदेश आहेत. जेणेकरून ही रुग्णवाहिका २४ तास कामात येईल. मात्र, परंड्याच्या रुग्णवाहिकेवर दोन चालक असूनही मात्र ते आपत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत गाडी हलविण्यास तयार नाहीत. त्यामुळे रुग्ण मात्र वाऱ्यावर असल्याच्या चर्चेला पेव फुटले आहे.
जिल्हाधिकारी यांना रुग्णांचे नातेवाईक महेश मोहन बोराडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवारी सकाळी रुग्णाला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर रात्री अचानक रुग्णांची तब्येत बिघडली असताना देखील नातेवाईकांना कळवण्यात आले नाही. शनिवारी सकाळी डॉक्टरांनी पुढील उपाचारासाठी बार्शीला हलवण्यासाठी सांगितले. यावर नातेवाईकांनी १०८ रुग्णवाहीकेस फोन केला. या ठिकाणी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका चालकासह उपलब्ध होती. मात्र, त्यावर आपत्कालीन वैद्यकीय अधिकारीच नसल्याने वृध्दाचा उपचाराआभावी मृत्यू झाला.रुग्णवाहिकेवर डॉक्‍टर असते तर त्याचे प्राण वाचले असते असे मत आता व्यक्त केले जात आहेत.

रुग्णवाहिकेचे आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवडकर सध्या कोरोना असल्यामुळे कामावर येत नाहीत. १०८ रुग्णवाहिका जिल्हा व्यवस्थापक यांचे या सेवेकडे दुर्लक्ष झाल्यानेच रुग्णवाहिकेवर डॉक्‍टरांची नियुक्ती करण्यात आली नसावी असे मत व्यक्त केले जात आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

वाचा : बुलढाण्यात ८० कोरोना पॉझिटिव्ह