Fri, Jul 10, 2020 17:49होमपेज › Marathwada › ​​​​​​​कारची मोटारसायकलला धडक होउन अपघात; एका युवकाचा मृत्यू!

​​​​​​​कारची मोटारसायकलला धडक होउन अपघात; एका युवकाचा मृत्यू!

Last Updated: Nov 17 2019 1:23AM
परळी वैजनाथ : प्रतिनिधी 

परळी बीड राज्य रस्त्यावर कार व दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार युवक ठार झाला आहे. तर या अपघातातील कार पुलावरून कठडे तोडून खाली कोसळली. सुदैवाने कारमधील लोकांना काहीही झाले नाही. 

परळी बीड राज्य रस्त्यावर गाढे पिंपळगाव फाट्याजवळील उतारावर भरधाव वेगाने  येणाऱ्या कारने (एम.एच.२३ ए.डी.१४५३) सिरसाळ्याहून मोटारसायकलवरून (एमएच ४४ई ७७५२) परळीकडे येणाऱ्या अनिकेत आव्हाड (वय २५) राहणार कंडक्टर काँलनी परळी या  युवकास जोराची धडक दिली. कार नदीवरील पुलाचे कठडे तोडून नदीत पडली. जखमी मोटर सायकल स्वार  युवकाला उपचारासाठी आंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. पुलावरुन खाली कोसळलेली कार नंतर पाण्यातून क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आली. सुदैवाने यातील कोणीही जखमी झालेले नाही.       

मयत अनिकेत आव्हाड हा आपल्या आई वडीलांना एकुलता एक होता. त्याला चार बहिणी आहेत. बहिणीचे लग्न करण्यात त्याचा मोठा वाटा होता. घरातील कर्त्या युवकाच्या अकाली  निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.