Sat, Jul 11, 2020 20:34होमपेज › Marathwada › राहुल बाबा तुम्ही काय खाऊन गरिबी हटवाल; मुख्यमंत्र्यांचा सवाल(Video)

राहुल बाबा तुम्ही काय खाऊन गरिबी हटवाल; मुख्यमंत्र्यांचा सवाल(Video)

Published On: Apr 09 2019 1:33PM | Last Updated: Apr 09 2019 1:37PM
औस: पुढारी ऑनलाईन

लातूर जिल्ह्यातील औसा येथै आज (ता.६) युतीची विराट सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या पंजोबांनी जो गरिबी हटवाचा नारा दिला नारा तोच नारा राहुल बाबा तुम्ही देत आहात, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल चढवला.

मुख्यमंत्री म्हणाले, की लोकसभा निवडणुकीचे मतदान जवळ आले असून लातूर आणि उस्मानाबादमध्ये महायुती निवडून आणण्यासाठी आपण इथे एकत्र आलो आहोत. मोदी आणि उध्दवजी जिथे एकत्र येतात तिथे काय गर्दी जमते हे आज तुम्ही पाहत आहात. ही निवडणूक गल्लीची नसून दिल्लीची आहे. देशाचा मानसन्मान राखण्याठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच ही निवडणूक म्हणजे भारताची अस्मिता आहे. भारताचा तिरंगा मोदींच्या नेतृत्वातच उंचावलेला राहू शकतो. पाच वर्षात परिवर्तन केले. भारताच्या ताकदीची ही निवडणूक आहे. 

तसेच ते पुढे म्हणाले, राहुल बाबा तुमच्या पंजोबांनी गरीबी हटावचा नारा दिला, त्यानंतर तुमच्या आजीने हाच नारा दिला. आईनेदेखील हा नारा दिला आहे. तुमच्या पिढ्यांनी गरिबी हटावचा नारा देऊनही तुम्हीदेखील तीच घोषणा देत आहात. असा आरोप करत राहुल बाबा तुम्ही काय खाऊन गरिबी हटवाल, असा सवाल फडणवीस यांनी राहुल गांधी यांना केला.