होमपेज › Marathwada › तूर खरेदी केंद्रात मापात पाप 

तूर खरेदी केंद्रात मापात पाप 

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 11:39PMमाजलगाव : प्रतिनिधी

येथील नाफेडच्या बाजार समिती आवारातील शासकीय तूर खरेदी केंद्रात शेतकर्‍यांच्या तुरीवर डल्ला मारल्याचे काम करून चक्क 50 किलो वजन काट्यातून 2 किलो तूर जादा घेऊन मापात पाप करत शेतकर्‍यांची लूट होत असल्याचा प्रकार उघडकीस बाजार समितीचे माजी सभापती नितीन नाईकनवरे व विद्यमान उपसभापती नीळकंठ भोसले यांनी मापातील पाप बंद करून सदरील काटे व क्विंटलमागे जादा घेत असलेले 1 किलो जादा तूर ही बंद घेणे बंद केली आहे.

शेतकरी बोंडआळीमुळे कापूस पिकामुळे बरबाद झाला असताना शासनाने नाफेडमार्फत जागोजागी शासकीय तूर खरेदी केंद्र चालू असल्याने माजलगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टी.एम.सी.आवारात दि.1 फेब्रुवारीपासून शासकीय तूर खरेदी केंद्र येथील खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून तूर खरेदी केंद्र सुरू आहे.   या ठिकाणी प्रत्येक पन्नास किलोच्या कट्ट्यात 500 गॅम म्हणजे 1 क्विंटल मागे 1 किलो  नाफेडच्या गोडाऊन किपरच्या नावाखाली जास्त घेऊन शेतकर्‍यांची लूट होत असल्याचा प्रकार उघड झाला.

गैरप्रकार रोखण्यासाठी बाजार समितीचे उपसभापती नीळकंठ भोसले व विद्यमान तज्ञ संचालक माजी सभापती नितीन नाईकनवरे यांनी या तूर खरेदी केंद्रावर जाऊन नादुरुस्त काट्याची पाहणी केली असता दोन किलोची खरोखरच तफावत आढळून आल्याने पाच काट्यांपैकी दोन काटे बंद करून नवीन काट्यांशिवाय तूर खरेदी करू नका असे खरेदी- विक्री संघाचे व्यवस्थापक ए.एस.पांडे यांना सागितले. त्याचबरोबर प्रतिक्विंटल मागे कोणतेही लेखी आदेश नसताना शेतकर्‍यांची एक किलो तूर जादा घेऊन शेतकर्‍यांची लूट चालू होती. हा गैरप्रकार या वेळी बंद करण्यात आला. 

शासकीय गोडाऊनच्या गोडाऊन किपरने आम्हाला क्‍विंटलमागे 1 किलो तूर जादा घेण्याचे सांगितल्यानुसार आम्ही 50 किलो कट्ट्यात 500 ग्राम म्हणजे क्‍विंटलमागे 1 किलो कट्ट्याचे वजन सोडून आतापर्यंत घेतले  आजपासून ते घेणार नाहीत.
 ए.एस.पांडे, व्यवस्थापक,
खरेदी विक्री संघ माजलगाव 

खरेदी-विक्री संघ शेतकर्‍यांचे तुरीचे माप घेताना जादा तूर घेत असतील तर हा गैरप्रकार आहे. जादा तूर घेण्याचे कुठलेही आदेश माझ्या स्तरावरून देण्यात आले नसल्याने या गैरप्रकरणाची माहिती घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल.
 एस.के.पांडव, जिल्हा शासकीय खरेदी अधिकारी,बीड

खरेदी-विक्री संघाच्या तूर खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांच्या मापातील क्‍विंटलमागे चार किलो व प्रत्येक शेतकर्‍यांच्या मापापेक्षा जास्त क्‍विंटलमागे 1 किलो जादा तूर घेऊन शेतकर्‍यांची लूट झाली आहे. त्या शेतकर्‍यांना लुटीची रक्कम देण्यात यावी, अन्यथा पणन संचालकाकडे तक्रार करण्यात येईल. अधिकारी, कर्मचार्‍यांनी असे प्रकार करू नयेत.
नितीन नाईकनवरे, माजी सभापती बाजार समिती माजलगाव